Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE ट्र्म्प यांचे अँटीबॉडी कॉकटेल भारतात, यात विशेष काय आहे?

ट्र्म्प यांचे अँटीबॉडी कॉकटेल भारतात, यात विशेष काय आहे?

अँटीबॉडी कॉकटेलला भारतानेही आता आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

Related Story

- Advertisement -

गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका सामर्थ्यवान देश असणाऱ्या अमेरिकेलाही बसला. अमेरिकेत दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या वाढत गेली. याचा ताण आरोग्य यंत्रणेवरही पडू लागला. परंतु अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प नेहमी विना मास्कचे दिसत होते तसेच त्यांचे समर्थकांनीही मास्क वापरण्यास विरोध दर्शवला. परंतु ऑक्टोबर २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली. परंतु दिवसातच ते कोरोनातून बरे होत जगासमोर आले. परंतु काही दिवसांतच कोरोना बरे करणारे असे कोणते औषध डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले होते असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. परंतु यावर आता एक नवीन माहिती उघडकीस आली आहे. ट्रम्प यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीजची एक मजबूत कॉकटेल घेतले असल्याचे समोर येत आहे. त्यावेळी या अँटीबॉडी कॉकटेलची बरीच चर्चा झाली. स्विजरलँड देशातील रोश या औषध उत्पादक कंपनीने तयार केलेल्या अँटीबॉडी कॉकटेलला भारतानेही आता आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. हे अँटीबॉडी कॉकटेल नेमके काय आहे आणि कोरोना रुग्णांना हे कसे मदत करते? हे पाहूया…

अँटीबॉडी कॉकटेलला भारताने दिली परवानगी

भारताच्या सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने स्विट्जरलँड देशातील रोश या औषध उत्पादक कंपनीने तयार केलेल्या अँटीबॉडी कॉकटेलला भारतानेही आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. हे औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त आहे. हे एक खास प्रकारचे अँटीबॉडी कॉकटेल एक किंवा दोन अँटीबॉडीजचे मिश्रण आहे. अमेरिकेत यास रिजेनरॉन कॉकटेल असे म्हटले जाते कारण हे कॉकटेल अमेरिकेतील रिजेनरॉन फार्मा कंपनीने बनवले होते. परंतु हे औषध इन्वेस्टिगेशनल ड्रग्सचा श्रेणीत ठेवण्यात आले. याचा अर्थ असा की अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने या औषधातील केमिलक सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यांच्या क्लिनिकल ट्रायल होणे अद्याप बाकी आहेत. परंतु या खास उपचाराची चर्चा ऑक्टोबर २०२० मध्ये झाली जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी हे अँटीबॉडी घेतले.

हे कॉकटेल आहे तरी कसे?

- Advertisement -

हे कॉकटेल अँटीबॉडीजचे तयार मिश्रण आहे. हे कॅसिरिविमॅब आणि इम्डिविमॅब एकत्र करून बनविले जाते. या अँटीबॉडी कॉकटेलचा उपयोग कोरोनाची कमी आणि मध्यम लक्षणे कमी लक्षणे असणाऱ्या परंतु जे हायरिस्क कॅटेगरीमध्ये येणाऱ्या कोरोना रुग्णांवर केला जातो. उदा. वयस्कर किंवा आधीपासूनच इतर आजाराने ग्रस्त. जेव्हा एखादा व्हायरस शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीरातील अनेक पेशींचे नुकसान किंवा गंभीर इजा करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी शरीरात काही प्रोटीन तयार होतात. ज्यांचा आकार Y शेपमध्ये असतो. हेच प्रोटीन व्हायरस किंवा बॅक्टेरियांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. याच प्रोटीन्सला अँटीबॉडी किंवा इम्युनोग्लोबीन म्हटले जाते. या अँटीबॉडीसला स्विजरलँडमधील एका कंपनीतील लॅबमध्ये बनवण्यात आले आहे. लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या या अँटीबॉडीज शरीरातील प्रतिकारशक्तीची नक्कल करत विषाणूंविरूद्ध लढतात. कॅसिरिविमॅब आणि इम्डिविमॅब नावाच्या या अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनवर विशेषतः हल्ला करतात. हे तेच स्पाइक प्रोटीन जे कोरोना व्हायरसवर काटेरी रुपात दिसतात. या काट्यांमुळे व्हायरस मानवी पेशींना चिकटून राहतो. परंतु अँटीबॉडीज या स्पाइकला चिकटण्यापासून प्रतिबंध करते.

या अँटीबॉडीज कोणासाठी वापरतात ?

अँटीबॉडीजचे हे कॉकटेल सर्वच कोरोना रूग्णांसाठी वापरले जात नाही. कोरोनासंसर्गाची कमी आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांनाच १० दिवसांचा आत हे अँटीबॉडीज दिले जातात. प्रौढ किंवा 12 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांना देखील हे अँटीबॉडीज दिले जाऊ शकते. ज्यांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होण्याचा धोका आहे अशा रुग्णांनाही हे अँटीबॉडीज देण्याची शिफारस केली गेली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोक ज्यांना आधीच मधुमेह, मूत्रपिंड-फुफ्फुसाचा आजार, बीपी किंवा हृदयाशी संबंधित आजार आहेत अशा लोकांचा समावेश आहे. परंतु कोरोनामुळे गंभीररित्या संक्रमित झालेल्या रुग्णांना हे अँटीबॉडीज दिले जाऊ शकत नाही.

त्याचे किती आणि कसे डोस दिले जातात ?

- Advertisement -

कॅसिरीविमॅब आणि इम्डिविमॅब दोन्ही एकत्र करून १२०० मिलीग्रामचा एक डोस दिला जातो. म्हणजे ६०० मिलीग्राम कॅसिरिविमॅब आणि ६०० मिलीग्राम इम्डिविमॅब. हे अँटीबॉडीज इंजेक्शनद्वारे शरीरात दिले जाते. हे २ डिग्री सेल्सियस ते ८ डिग्री सेल्सियस तापमानात स्ट्रोर केले जाते.

हे अँटीबॉडीज किती प्रभावी आहे?

हे अँटीबॉडीजचे कॉकटेल तयार करणाऱ्या रोश या कंपनीने क्लिनिकल ट्रायल्सच्या आधारे असा दावा केला आहे की हे अँटीबॉडीजचे कॉकटेल अधिक प्रभावी आहे. या कंपनीने असाही दावा केला की, या अँटीबॉडीजमुळे कोरोना रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा धोका ७० टक्क्यांपर्यंत कमी होतो. कॅसिरिविमॅब आणि इम्डिविमॅबचे कॉकटेल कोरोनाच्या लक्षणांना ४ दिवसांपर्यंत मर्यादित करते.

किती रुपयांना मिळणार या अँटीबॉजीज ? 

भारतात ही अँटीबॉडी केव्हा आणि किती रुपयांना उपलब्ध होणार ? रोश फार्मा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी इंग्रजी वृत्तपत्र दि इंडियन एक्सप्रेसला ईमेल पाठवलेल्या उत्तरात असे म्हटले आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर औषधाचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर कार्य करीत आहोत. आमची कंपनी हे औषध भारतात आयात करेल आणि सिप्ला कंपनीसमवेत बाजारात विक्री करेल. किती डोस द्यावा किती रुपयांना मिळेल हे येत्या काही दिवसांत सांगू, कारण सिप्ला कंपनीसह आमची चर्चा सुरु आहे. त्यामुळे याचा लॉन्चिंग प्लॅन घेऊन येत त्याविषयी माहिती दिली जाईल. आम्ही शक्य तितक्या लवकर औषधाचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर कार्य करीत आहोत. कंपनी ती भारतात आयात करेल आणि सिप्लासमवेत बाजारात विक्री करेल. किती डोस द्यावा लागेल हे सांगणे फार लवकर आहे. सिप्ला यांच्याशी आमची चर्चा आहे. ते लॉन्चिंग प्लॅन घेऊन येताच त्याविषयी माहिती दिली जाईल. सध्या भारतात त्याची किंमत किती असेल व ती कोठे व कोणत्या वाहिनीद्वारे उपलब्ध होईल, याचे उत्तर अद्याप सापडले आहे. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की. जेव्हा लोक आधीपासूनच उपलब्ध उपचारांसाठी लांबच्या रांगामध्ये उभे आहेत तेव्हा हे औषध रुग्णांपर्यंत सहजपणे कसे पोहोचता येईल?


 

- Advertisement -