Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राजकारणानंतर आता Donald Trump बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार

राजकारणानंतर आता Donald Trump बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार

Related Story

- Advertisement -

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) राजकारणापासून दूर झाल्यानंतर आता बॉक्सिंगच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार झाले आहेत. ट्रम्प रिंगणात उतरून फाईट करणार नसून ते बॉक्सिंगसोबत नाळ बांधायला जात आहेत. बॉक्सिंगमध्ये ट्रम्प कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. ट्रम्प बॉक्सिंगमधील सामन्याचे कॉमेंट्री करतील, ज्यामध्ये माजी हेवीवेट चॅम्पियन इव्हँडर होलीफील्ड देखील सामील होणार आहे. (donald trump will host holyfield vs belfort boxing match in florida)

- Advertisement -

ट्रम्पसोबत त्यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनिअर देखील सोबत असेल. हॉलिवूडमध्ये होणाऱ्या या सामन्याचे फीड एफआयटीई डॉट टीव्हीवर उपलब्ध होईल. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘मला महान फायटर आणि बॉक्सिंग सामने आवडतात. यावेळेस मी शनिवारी रात्री अशा एका सामन्याचा हिस्सा होणार आहे आणि आपले विचार समोर ठेवणार आहे. तुम्ही हे पाहणे चुकवू नका.’

यापूर्वी हा सामना लॉस आंजल्समध्ये होणार होता, ज्यामध्ये ऑस्कर डे ला होयाचा विटर बेल्फोर्टसोबत सामना होणार होता. पण डे ला होया कोरोनाबाधित आढळल्यानंतर अचानक इव्हँडर होलीफील्डला सामील केले आहे. होलीफील्डचे वय पाहून कॅलिफोर्निया राज्य अॅथलेटिक आयोगाने परवानगी देण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे आता हा सामना फ्लोरिडामध्ये होणार आहे. होलीफील्ड पुढच्या महिन्यात ५९ वर्षाचा होणार असून तो २०११ पासून रिंगणात उतरला नाही आहे.


- Advertisement -

हेही वाचा – तर AUS VS AFG पहिली कसोटी रद्द करू, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची तालिबांन्यांना तंबी


- Advertisement -