घरताज्या घडामोडीUS Capitol Attack : Donald Trump यांना न्यायालयाचा दणका ! कॅपिटॉल हल्ला...

US Capitol Attack : Donald Trump यांना न्यायालयाचा दणका ! कॅपिटॉल हल्ला दस्तावेजाची याचिका फेटाळली

Subscribe

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना जोरदार दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी दाखल केलेल्या एका याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी केलेली मागणी फेटाळली आहे. ट्रंप यांनी गेल्या वर्षी ६ जानेवारी २०२१ मध्ये कॅपिटॉल येथे ट्रंप समर्थकांनी यूएस कॅपिटॉलवर केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याशी संबंधित कॉंग्रेसनल कमिटीची कागदपत्रे जाहीर करण्यापासून बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका ट्रम्प यांनी दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. (Donald trumps bid to block US capitol attack rejected by supreme court)

खंडपिठाचा निकाल काय ?

या कागदपत्रांच्या राष्ट्रीय पातळीवर दस्तावेजीकरणालाही ट्रंप यांनी विरोध केला. ही सगळी कागदपत्रे गोपनीय असावीत अशी मागणी ट्रंप यांनी केली होती. न्यायालयाने या दस्तावेजीकरण प्रक्रियेला स्थगिती द्यावी, असेही याचिकेत म्हटल होते. पण सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ९ न्यायाधीशांच्या खंडपिठाने निकाल देताना ८-१ असे मतदान या निकालाच्या निमित्ताने झाले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा न देता कनिष्ठ कोर्टाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ट्रंप यांना मोठा दणका समजला जात आहे. या खंडपिठातील क्लेरेन्स थॉमस हे एकमेव न्यायाधीस होते ज्यांनी स्थगिती देण्याच्या मुद्द्याचे समर्थन केले होते.

- Advertisement -

ट्रंप यांनी वापरले अधिकार

ट्रंप यांनी ही याचिका करताना त्यांचे माजी राष्ट्रपती म्हणून अधिकार वापरतानाच व्हाईट हाऊसचे हल्ल्याशी संबंधित दस्तावेज आणि संभाषण गोपनीय ठेवण्याचे अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वकिलांनी माजी राष्ट्रपतींचा हा अधिकार असल्याचाही युक्तिवाद केला. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा युक्तीवादही वकिलांनी केला. डेमोक्रॅटिक प्रतिनिधींच्या समितीकडून हा राजकीय खेळ सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणात मत मांडताना स्पष्ट केले की, ट्रम्प यांच्या दस्तावेजांच्या बाबतीतल्या वैयक्तिक हेतू पेक्षा सार्वजनिक हित हे व्यापक आहे.

ईमेल, फोन कॉलचा रेकॉर्ड 

या कागजपत्रामध्ये मुख्यत्वेकरून अमेरिकेच्या कॅपिटॉलशी संबंधित ६ जानेवारीच्या हल्ल्यातील ईमेल आणि फोन रेकॉर्डचा समावेश आहे. जो बायडेन यांच्या नोव्हेंबर २०२० रोजीच्या विजयानंतर कॉग्रेसनल सर्टीफिकेशनच्या दरम्यान ट्रम्प समर्थकांनी यूएस कॅपिटॉल येथे हल्ला केला होता. ट्रंप मागणी करत असलेल्या कागदपत्रांमध्ये ईमेल्स, फोन रेकॉर्ड्स, ब्रिफिंग मटेरिअल, इतर रेकॉर्डचा समावेश आहे. एकुण ७७० पानांचा हा दस्तावेज आहे. त्यामध्ये प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या रेकॉर्डचाही यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

 

समितीमार्फत चौकशी सुरू

 

ट्रंप यांनी केलेल्या याचिकेत व्हाईट हाऊसच्या रोजनिशीतील माहिती प्रसारीत करण्यावरही बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामध्ये ६ जानेवारीला हस्तलिखित स्वरूपाचे सेव्ह अमेरिका रॅलीच्या दरम्यानच्या भाषणाची नोट सार्वजनिक होऊ नये अशीही मागणी ट्रंप यांनी केली आहे. या प्रकरणात आला कॉंग्रेसनल कमिटी ही हल्ला कसा झाला, तर कॉंग्रेस कशा पद्धतीने बंद पाडली ? तसेच ट्रंप आणि त्यांच्या सभोवतालच्या व्यक्तींचा यामध्ये कशा पद्धतीने सहभाग आहे, यासारख्या गोष्टींचा तपास करत आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -