तिरुपती मंदिरात भक्ताने अर्पण केली पाच किलो सोन्याची तलवार; किंमत ऐकूण व्हाल थक्क!

तिरूपती बालाजी मंदिर

प्रत्येक माणसांची कोणत्या न कोणत्या देवावर श्रद्धा असते. या श्रद्धेपोटीच भाविक आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या देवाला मनोभावे प्रार्थना करतात आणि काहीवेळी नवस देखील करतात. आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिर हे देशातील सर्वात प्रसिद्ध श्रीमंत मंदिरांपैकी एक असून असे देखील सांगितले जाते की, हा देव सर्व इच्छांची पूर्ती करतो. तिरुपती मंदिर येथे भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांना कोट्यावधी रुपयांचे नैवेद्य दाखवले जातात.

हैदराबादमधील एका व्यावसायिकाने सोमवारी भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात एक कोटी रुपये किंमत असणारी सोन्याची ‘सूर्य कटारी’ म्हणजेच तलवार बालाजीच्या चरणी अर्पण केली आहे. तिरुमाला तिरुपति देवस्थानम (टीटीडी) अधिकाऱ्यांने सांगितलेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या तलवारीचे वजन पाच किलो होते. ज्यामध्ये दोन किलो सोने आणि तीन किलो चांदी वापरण्यात आली होती.

आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात प्रभू विष्णूने काही वेळासाठी स्वामी पुष्करणी तलावाच्या किनारी निवास केला होता. त्यामुळेच या ठिकाणी भगवान विष्णूचा इथे वास असल्याची भावना अनेक भविकांमध्ये आहे. हे ठिकाणी आज तिरुपती बालाजी म्हणून सर्वांनाच परिचित आहे. तिरुपती बालाजी मंदिरात भक्त फक्त पैसे किंवा सोनंच अर्पण करत नाही तर आपले केस अपर्ण करतात. तिरुपतीच्या चारही बाजूला असलेल्या डोंगररांगाना शेषनागाचे सात फण मानले जातात. त्यामुळेच या डोंगररांगाना सप्तगिरी असं म्हटलं जातं. श्री व्यंकटेश्वराचं मंदिर हे सप्तगिरीच्या सातव्या डोंगरावर आहे. जो वेंकटाद्री नावाने ओळखले जाते.


Corona Third Wave : ऑक्टोबरदरम्यान येणारी कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक, IIT कानपूरचा दावा