घरताज्या घडामोडीपाकिस्तानात गाढवाला मिळाला जामीन, चार दिवसांसाठी ठेवले होते कस्टडीत!

पाकिस्तानात गाढवाला मिळाला जामीन, चार दिवसांसाठी ठेवले होते कस्टडीत!

Subscribe

पाकिस्तानात जुगार खेळणाऱ्या गाढवाला अटक केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तान पोलिसांना ट्रोल केले होते.

पाकिस्तानमध्ये एका गाढवाला जुगार खेळण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी जुगार खेळताना आठ जणांना पकडले आणि त्यांच्याबरोबर गाढवाला देखील अटक केली होती. मात्र आता सर्वांना कोर्टाकडून जामीन मिळाली आहे. पण ही घटना उघडकीस येताच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी पाकिस्तान पोलिसांना चांगलचं ट्रोल केलं होत.

याप्रकरणात अटक केलेल्या आठ जणांनाही जामीन दिला आहे. पाकिस्तानमध्ये एका ग्रामीण भागात हे सर्व जण बेकायदेशीरपणे गाढवाची शर्यत घेत होते. हे गाढव ४० सेकंदात ६०० मीटर धावू शकेल अशी पैज या लोकांनी लावली होती. या घटनेनंतर सोशल मीडियावर गाढवाला कसे पकडले आणि नंतर जामीन कसा मिळाला यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र या गाढवाला चार दिवसांसाठी कस्टडीत ठेवण्यात आळे होते, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

माल वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर पाकिस्तानातील ग्रामीण भागात केला जातो. तसेच या भागात गाढवाच्या शर्यतीवर पैज लावणे हे देखील केले जाते. ही गाढवाची घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिम यार या भागात घडली होती. ही बेकायदेशीर शर्यत सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या सर्वांना अटक केली होती. जुगार खेळणाऱ्या आरोपींकडून १ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले असून ते गाढवाच्या शर्यतीवर पैसे खर्च करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.


हेही वाचा – कोरोना व्हायरसचा प्रसार हवेच्या माध्यमातून!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -