घरअर्थजगतघाबरू नका! डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती उत्तम; अर्थमंत्र्यांचा दावा

घाबरू नका! डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती उत्तम; अर्थमंत्र्यांचा दावा

Subscribe

नवी दिल्ली –  गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयांचं मूल्य घसरत आहे. त्यामुळे देशभरात आर्थिक मंदीची चिंता व्यक्त केली जातेय. मात्र, यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे. जगातली इतर चलनांच्या तुलनेत रुपया अधिक भक्कपणे उभा आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया खूप मजबूत असल्याचं दिसून येतंय. तसंच, रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

हेही वाचा – शंभर वर्ष जुन्या बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांना पैसे परत मिळणार का?

- Advertisement -

स्पष्टीकरण देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, चलनाच्या चढ-उतार आणि अस्थिरतेच्या काळात केवळ भारतीय चलनाचा बचाव झाला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया उत्तम स्थिती आहे. प्रतिस्पर्ध्यांमध्ये रुपयाची पकड चांगली आहे.

हेही वाचा – सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच, 6 महिन्यांत 6000 रुपयांनी स्वस्त, आजचा भाव काय?

- Advertisement -

शुक्रवारी डॉलरच्या किंमतीत रुपयाची चांगलीच पडझड झालेली पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ८१ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जातेय. दरम्यान, अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने तिसऱ्यांदा व्याजदरात ०.७५ टक्क्यांनी वाढ केलीय. त्यामुळे चलनांचं मूल्य डॉलरच्या तुलनेत घसर आहे. फेडरल रिझर्व्हकडून मिळत असलेल्या संकतेनुसार, जगभरातील गुंतवणूकदार पैसे काढत असून सुरक्षिततेसाठी अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवत आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -