घरदेश-विदेशहमीद अन्सारी म्हणतो चुक 'माझीच'

हमीद अन्सारी म्हणतो चुक ‘माझीच’

Subscribe

होय चूक माझी आहे!! दुसऱ्याचा दोष देण्यात काहीच अर्थ नाही. ही प्रतिक्रिया आहे नुकत्याच भारतात परतलेल्या हमीद अन्सारीची.

होय चूक माझी आहे!! दुसऱ्याचा दोष देण्यात काहीच अर्थ नाही. ही प्रतिक्रिया आहे नुकत्याच भारतात परतलेल्या हमीद अन्सारीची. प्रेयसीचं लग्न रोखण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानमध्ये गेलेल्या हमीद अन्सारीला पाकिस्तान पोलिसांनी अटक केली. अखेर त्याच्यावर हेरगिरीच्या आरोपाखाली खटला चालला. पण, त्यातून सिद्ध काहीच झालं नाही. त्यानंतर बनावट पासपोर्टच्या आरोपाखाली हमीद अन्सारीला सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. अखेर भारताकडून आणि पाकिस्तानातील देखील काही संस्थांनी, कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि हमीदची सहा वर्षानंतर सुटका झाली. त्यानंतर हमीद भारतात आला असून यावेळी तो प्रचंड भावूक झाल्याचं पाहायाला मिळाला. या साऱ्या घडामोडींमध्ये चूक माझी आहे. कुणालाही दोष देणार नाही असं म्हटलं आहे. हमीद अन्सारी मुंबईमध्ये दाखल झाला आहे.

काय आहे सारं प्रकरण??

हमीद अन्सारी मुळचा मुंबईतील वाद्र्यातील राहणारा. पेशानं इंजिनिअर असलेल्या हमीदची फेसबुकच्या माध्यामातून पाकिस्तानी तरूणीशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर तरूणीचं लग्न ठरल्यानं त्यातून तिची सुटका करण्यासाठी हमीदनं पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. अखेर अफगणिस्तानमार्गे हमीद पाकिस्तानला पोहोचला. सुरूवातीपासून हमीदवर नजर ठेवून असलेल्या गुप्तचर विभागानं पोलिसांच्या मदतीनं हमीदला अटक केली. त्याच्यावर हेरगिरीचे आरोप लावले गेले. पण, न्यायालयामध्ये ही बाब सिद्ध करणं मात्र पाकिस्तानला जमलं नाही. त्यानंतर हमीदवर पासपोर्ट कायद्यातंर्गत खटला चालवला गेला. त्यामध्ये त्याला सहा वर्षाची शिक्षा देखील झाली. पण, सहा वर्षानंतर हमीद भारतात आला आहे. यावेळी त्यानं सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार देखील मानले आहेत.

- Advertisement -

वाचा – पाकिस्तानात अडकलेला झाराच्या ‘वीर’ची आज देशवापसी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -