घरदेश-विदेशकोरोनातून बरे झाल्यानंतर ही 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; गंभीर आजाराचा असू...

कोरोनातून बरे झाल्यानंतर ही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; गंभीर आजाराचा असू शकतो धोका

Subscribe

भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढत असल्याने देशातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र काही रुग्णांच्या बाबतीत SARS-COV-2 चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील लोकांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतोय. नवीन अभ्यासानुसार, कोविड -१९ ची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन आजार देखील वाढताना दिसून येतायंत. या समस्या रुग्णांमध्ये कोरोना रिकव्हरी नंतरही बर्‍याच दिवसांपर्यंत दिसू शकतात. कोरोनामुळे बराच काळ आजारी आहेत असे रुग्ण एखाद्या जुन्या आजाराला बळी पडू शकतात किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने त्यांना विशेष काळजी घ्यावी लागू शकते.

कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांवर कित्येक संशोधन केले जात आहे. जे असे दर्शविते की गंभीर संक्रमणांशी झुंज देणाऱ्या रूग्णांना हृदयविकार आणि मानसिक आरोग्यास मोठी हानी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, कोविड -१९ पासून बरे झालेल्या रूग्णांना आता केवळ फॉलोअप स्क्रीनिंग किंवा चाचण्या करणे आवश्यक नाही, तर प्रत्येक लक्षणं आणि त्यांचा धोका वेळीच ओळखणे देखील आवश्यक आहे. लाँग कोविड किंवा पोस्ट कोविड एक सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. ज्यामध्ये रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ४ आठवड्यांपर्यंत एखाद्या रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवू शकतात. आकडेवारीनुसार, चारपैकी एका कोरोना रूग्णाला दीर्घ कालावधीसाठी ही लक्षणे दिसू शकतात.

- Advertisement -

कोणते असतात लक्षणं

एका अहवालानुसार, कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना एक आठवडा किंवा महिन्यानंतरही लक्षणे जाणवू शकतात. सतत खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी आणि मेंदूतील स्नायू दुखणे यासारख्या तक्रारी असू शकतात. दरम्यान, डॉक्टरांच्या मते, कोविड -१९ व्यतिरिक्त काही रुग्णांमध्ये, शरीरातील खराब कार्यामुळे हे दीर्घकालीन आजार देखील उद्भवू शकतात. हे आपल्या मेटाबॉलिक सिस्टम, न्यूरोलॉजिकल आणि इन्फ्लेमेटरी हेल्थवर विपरित परिणाम करू शकतात.

हे आजार असतील तर काळजी घ्या

  • मधुमेह
  • मायोकार्डिटिस किंवा हृदयासंबंधित कोणतीही समस्या
  • मानसिक विकार
  • मूत्रपिंडाचा आजार
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -