घरदेश-विदेशMahaparinirvan Din: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; अनुयायांसाठी विशेष सुविधा, काय आहे नियमावली?

Mahaparinirvan Din: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; अनुयायांसाठी विशेष सुविधा, काय आहे नियमावली?

Subscribe

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने दादर चैत्यभूमी परिसरात मोठ्या संख्येने अनुयायी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनुयायांना चैत्यभूमी परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र कोरोना संकट अद्याप कमी न झाल्याने यंदाही प्रशासनाने अनुयायांना गर्दी न करता महामानवाला अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. परंतु तरीही हजारोंच्या संख्येने अनुयायी दादर परिसरात दाखल झाले आहे.

अनुयायांसाठी विशेष सुविधा

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून चैत्यभूमी परिसरात भव्य मंडप उभारले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटचे वाढते संकट पाहता अनुयायांसाठी विशेष आरोग्य सुविधा, कोरोना चाचणी आणि लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर आणि इतर मेडिकल सुविधाही पालिकेकडून पुरवण्यात येत आहे. मात्र अनुयायांनी योग्य खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

अनुयायांसाठी धावणार स्पेशल ट्रेन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने स्पेशल ट्रेन सोडल्या आहे. ५ आणि ६ डिसेंबरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यानच्या प्रवासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. या सर्व गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

काय आहे नियमावली?

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे संकट लक्षात घेता महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेन तसेच राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

- Advertisement -

१) यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमी परिसरात गर्दी न करता घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आवाहन मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले आहे.

२) राज्य सरकारच्या सुचनेनुसार, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात अनुयायांना कोणतेही स्टॉल्स लावता येणार नाहीत.

३) चैत्यूभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या नेतेमंडळी आणि मान्यवरांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक. जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर त्या मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

नेमका का साजरा केला जातो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस?

भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची आज ६५ वी पुण्यतिथी आहे, त्यांचे महापरिनिर्वाण (मृत्यू) ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला. भारताचे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक म्हणून त्यांचे कार्य थोर होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांवरील (दलित) सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम सुरु केली. तसेत कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. शिवाय भारतासारख्या सर्वात मोठ्या भारतीय राज्यघटनेचे जनक आणि प्रजासत्ताक भारताचे ते शिल्पकार होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी जातीवाद दूर करण्यासाठी गरीब, दलित, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यामुळे या दिवशी त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.

६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर चौपाटीवर बौद्ध धर्माच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते ठिकाण चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -