अमेरिका-कॅनडा सीमेवर चार भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांनी दोन्ही राजदूतांकडे मागितला अहवाल

मंटोबा कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडाच्या सीमेवर झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे एका लहान मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

dr jaishankar on report that 4 indian nationals have lost their lives at the canada us border
अमेरिका-कॅनडा सीमेवर चार भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांनी दोन्ही राजदूतांकडे मागितला अहवाल

अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडाच्या सीमेवरून एक ह्रदयस्पर्शी घटना समोर आली आहे. थंडीमुळे येथे एका भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एका नवजात बाळाचाही समावेश आहे. मात्र हे प्रकरण मानवी तस्करीचे संभाव्य प्रकरण असल्याचे म्हटले जातेय. या घटनेवर आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी कुटुंबियांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, एका लहान मुलासह चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. मी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांतील आमच्या राजदूतांना परिस्थितीचा त्वरित अहवाल देण्यास सांगितले आहे.

मंटोबा कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडाच्या सीमेवर झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे एका लहान मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन प्रौढ आणि एक अल्पवयीन मृतदेह आणि नवजात बालकाचा समावेश आहे. हे मृतदेह अमेरिकेच्या सीमेपासून थोड्या अंतरावर सापडले आहेत. प्राथमिक तपासात सर्वांचा मृत्यू हा थंडीमुळे झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात असून, हे कुटुंब भारतीय असल्याचे सांगितले जात आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये मात्र हे मानवी तस्करीचे संभाव्य प्रकरण असल्याचे म्हटले जातेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, मृत व्यक्ती या भारतातील असून त्या कॅनडातून अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.