Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश किरण बेदी यांना पुडुचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन काढलं!

किरण बेदी यांना पुडुचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन काढलं!

Related Story

- Advertisement -

किरण बेदी यांना पुडुचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन काढण्यात आलं आहे. त्यांच्या जागी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांना अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुडुचेरी मधील काँग्रेस सरकार आणि किरण बेदी यांच्यामध्ये बराच संघर्ष सुरु होता. १० फेब्रुवारीला मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना निवेदन देत किरण बेदी यांना परत बोलविण्याचे आवाहन केले. तुघलक दरबार चालवित असल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला होता.

- Advertisement -

पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार अल्पसंख्यांकात आलं आहे. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. यानंतर सध्याच्या सभागृहात काँग्रेसप्रणित आघाडीचे १४ आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारने विधानसभेत आपलं बहुमत गमावलं आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की त्यांच्या सरकारकडे सभागृहात ‘बहुमत’ आहे. पुडुचेरी विधानसभेसाठी एप्रिल-मेमध्ये निवडणुका होणार आहेत.

पुडुचेरी विधानसभेत काँग्रेसचे १०, द्रमुकचे ३, अखिल भारतीय एनआर काँग्रेसचे ७, एआयएडीएमकेचे ४, भाजपचे ३ आणि १ अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एका आमदारांना अपात्र ठरविण्यात आलं आहे. पुडुचेरीमध्ये बहुमताचा आकडा हा १५ आहे.

- Advertisement -