Homeदेश-विदेशDr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग नेहमीच घालायचे निळ्या रंगाची पगडी,...

Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग नेहमीच घालायचे निळ्या रंगाची पगडी, कारण…

Subscribe

डॉ. मनमोहन सिंग हे देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले पहिले शीख पंतप्रधान होते. पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कायमच निळ्या रंगाची पगडी घातल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) रात्री निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने डॉ. मनमोहन सिंग यांचा निधन झाल्याची माहिती एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांच्या आठवणींना देखील उजाळा देण्यात येत आहे. पण आता डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे ती म्हणजे त्यांची निळ्या रंगाची पगडी… (Dr. Manmohan Singh always wore a blue turban because)

डॉ. मनमोहन सिंग हे देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले पहिले शीख पंतप्रधान होते. पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कायमच निळ्या रंगाची पगडी घातल्याचे पाहायला मिळाले. पण ते महाविद्यालयीन काळापासूनच निळ्या रंगाचीच पगडी घालत होते. पण ते निळ्या रंगाचीच पगडी का घालत होते? याबाबत त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले होते. 2006 या वर्षी मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडून ‘डॉक्टरेट ऑफ लॉ’ ही पदवी देण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांचे त्यांच्या निळ्या पगडीकडे लक्ष वेधले. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी निळ्या रंगाची पगडी घालण्याचे कारण सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा… Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ होणार अंत्यसंस्कार; के.सी वेणुगोपाल यांची माहिती

सतत निळ्या रंगाची पगडी घालणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज विद्यापीठातील त्यांच्या मित्रांनी ‘ब्ल्यू टर्बन’ असे ठेवले होते. डॉ. मनमोहन सिंग सांगतात की, निळ्या रंगाची पगडी घालण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. त्यांना निळा रंग खूप आवडतो म्हणून ते निळ्या रंगाची पगडी घालतात. एवढ्या वर्षांनंतर आजही मनमोहन सिंग निळीच पगडी घालायचे. कालांतराने म्हणजेच राजकारणात आल्यानंतर या रंगात किंचितसा फरक दिसून आला. पण त्यांनी निळ्या रंगाला कायमच महत्त्वाचे स्थान बनवून हा रंग त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवून घेतला.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -