Homeदेश-विदेशDr Manmohan Singh : अमेरिका-भारत संबंध वृद्धिंगत झाले ते डॉ. मनमोहन सिंग...

Dr Manmohan Singh : अमेरिका-भारत संबंध वृद्धिंगत झाले ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळेच – बायडेन

Subscribe

अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्य आज अभूतपूर्व पातळीवर पोहोचले असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या धोरणात्मक दृष्टिकोन आणि राजकीय धाडसी निर्णयाशिवाय हे शक्य झाले नसते.

(Dr Manmohan Singh) वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध वृद्धिंगत होऊन या टप्प्यापर्यंत पोहोचले असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. (Biden expressed his feeling that the US-India relationship has grown only because of Manmohan Singh)

मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 अशी 10 वर्षे भारताचे पंतप्रधान होते. गुरुवारी रात्री वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे निधन झाले. यासंदर्भात व्हाइट हाऊसने एक निवेदन जारी केले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्य आज अभूतपूर्व पातळीवर पोहोचले असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या धोरणात्मक दृष्टिकोन आणि राजकीय धाडसी निर्णयाशिवाय हे शक्य झाले नसते. अमेरिका-भारत नागरी आण्विक करार पुढे नेण्यापासून इंडो-पॅसिफिक भागीदारांमधील पहिल्या क्वाड शिखर परिषद आयोजित करण्यात मदत करण्यापर्यंत, त्यांनी एक मार्गदर्शकाची भूमिका बजावली. हे योगदान उभय राष्ट्रांसह जगाला पुढील पिढ्यांसाठी मजबूत करत राहील. ते खरे राजकारणी आणि एक समर्पित लोकसेवक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो एक कनवाळू आणि नम्र व्यक्ती होते, असे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा – Dr Manmohan Singh : जुमलेबाजी न करताही देशाचे नेतृत्व करता येते…, ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

सिनेटच्या फॉरेन रिलेशन कमिटीचे अध्यक्ष असताना 2008मध्ये तसेच व्हाइस प्रेसिडंटन्ट असताना 2009मध्ये अमेरिकेकडून अधिकृत राजकीयदौऱ्यादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटण्याची संधी आपल्याला मिळाली, असे बायडेन यांनी म्हटले आहे. शिवाय, 2013मध्ये सुद्धा त्यांनी माझे नवी दिल्लीत आदरातिथ्य केले होते. जगातील महत्त्वाच्या संबंधांपैकी एक अमेरिका-भारत संबंध आहेत, यादृष्टीने आम्ही चर्चाही केली होती, असेही त्यांनी नमूद केले आहे.

या कठीण काळात, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जो दृष्टीकोन ठेवून आपले जीवन समर्पित केले त्यासाठी आम्ही पुन्हा वचनबद्ध आहोत. मी आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन माजी फर्स्ट लेडी गुरशरण कौर, तिची तीन मुले आणि भारतातील सर्व लोकांप्रती मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो, असे बायडेन यांनी म्हटले आहे. (Dr. Manmohan Singh: Biden expressed his feeling that the US-India relationship has grown only because of Manmohan Singh)

हेही वाचा – Dr Manmohan Singh : काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रणव मुखर्जींची कन्या संतापली, म्हणाली…


Edited by Manoj S. Joshi