दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी निगम बोधघाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या तोफखाना गाडीमधून त्यांचे पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे तिन्ही सैन्याने त्यांना सलामी दिली. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचे विधी पार पडले. वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पण डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या अंत्यसंस्काराचं ठिकाण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणावरून टीका केली आहे. (dr manmohan singh cremated at nigambodh ghat political row erupts rahul gandhi arvind kejriwal)
“सध्याच्या सरकारने भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समाजाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करून त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. एका दशकासाठी ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला असून, त्यांची धोरणे आजही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देत आहेत. आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार अधिकृत समाधीत करण्यात आले, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली अर्पण करता येईल. डॉ. मनमोहन सिंग आमच्या सर्वोच्च आदर आणि समाधीचे पात्र आहेत. देशाच्या या महान सुपुत्राबद्दल आणि त्यांच्या गौरवशाली समाजाबद्दल सरकारने आदर दाखवायला हवा होता”, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
भारत माता के महान सपूत और सिख समुदाय के पहले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंह जी का अंतिम संस्कार आज निगमबोध घाट पर करवाकर वर्तमान सरकार द्वारा उनका सरासर अपमान किया गया है।
एक दशक के लिए वह भारत के प्रधानमंत्री रहे, उनके दौर में देश आर्थिक महाशक्ति बना और उनकी नीतियां आज भी देश के…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2024
“भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करण्यात आले. याआधी भारताच्या सर्व पंतप्रधानांवर राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख समाजातून आलेले आणि जगभर प्रसिद्ध असलेले आणि 10 वर्षे भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि समाधीसाठी 1000 यार्ड जागाही भाजप सरकार देऊ शकली नाही”, असं म्हणत आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
ये खबर सुनकर मैं स्तब्ध हूँ।
भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंह जी का अंतिम संस्कार निगम बोध घाट पर किया गया। इसके पूर्व भारत के सभी प्रधानमंत्रियों का अंतिम संस्कार राजघाट पर किया जाता था।
सिख समाज से आने वाले, पूरी दुनिया में ख्याति प्राप्त, 10 वर्ष भारत के…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 28, 2024
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज (28 डिसेंबर) दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर मोठी मुलगी उपिंदर सिंग यांनी अंत्यसंस्कार केले. माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया आणि प्रियांका गांधी उपस्थित होते. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल यांच्यासह अनेक परदेशी पाहुणेही निगम बोध घाटावर पोहोचले होते.
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांना झेड प्लस सुरक्षा