नवी दिल्ली : देशाचे अर्थतज्ज्ञ, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे. शनिवारी (28 डिसेंबर) डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सध्या मनमोहन सिंग यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले असून त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित विविध आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. अशातच आता त्यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात नेमक्या किती पत्रकार परिषद घेतल्या? त्यांनी किती विदेश दौरे केले? याबाबतची चर्चा होत आहे. (Dr. Manmohan Singh During 10 years as Prime Minister How many times hold a press conference?)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यामुळे कायमच मोदींची तुलना माजी पंतप्रधान मनमोहन सिंद आणि मोदी यांच्या कार्यकाळाची अनेकांकडून तुलना करण्यात आली आहे. विरोधकांनी तर कायमच या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधल्याचे पाहायला मिळाले आहे. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी किती वेळा पत्रकार परिषद घेतली, याची संपूर्ण माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळी पक्षाचे माध्यम प्रमुख असलेल्या मनीष तिवारी यांनी 03 जानेवारी 2024 रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. या पत्रकार परिषदेला स्वतः डॉ. मनमोहन सिंग सुद्धा उपस्थित होते.
हेही वाचा… Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग नेहमीच घालायचे निळ्या रंगाची पगडी, कारण…
मनीष तिवारी यांनी माहिती देत म्हटले होते की, पंतप्रधान असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी एकूण 117 पत्रकार परिषदा घेतल्या. 72 विदेश दौरे, 10 वार्षिक परिषदा, 23 वेळा राज्यांचे दौरे आणि 12 वेळा निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले होते, अशी माहिती देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे 03 जानेवारी 2024 रोजीच मनीष तिवारी यांनी ही माहिती दिली आणि या तारखेलाच मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेला 10 वर्ष पूर्ण झाले होते. याच पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग म्हणाले होते की, मी माध्यमांना घाबरणारा पंतप्रधान नाही. मी नियमितपणे पत्रकार परिषदा घेत होते. विदेश दौऱ्यावर जाताना आणि तिथून आल्यावर मी माध्यमांशी बोलत होतो.