Homeक्रीडाDr. Manmohan Singh : भारतीय संघाने सामना खेळताना व्यक्त केला शोक, हाताला...

Dr. Manmohan Singh : भारतीय संघाने सामना खेळताना व्यक्त केला शोक, हाताला बांधली काळी पट्टी

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान आणि भारताचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ भारतीय संघाच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधल्याचे पाहायला मिळाले.

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारताचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघानेही मनमोहन सिंग यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. कारण खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडून हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरल्याचे पाहायला मिळाले. (Dr. Manmohan Singh Indian team expressed their condolences while playing the match, wearing a black armband)

मेलबर्नमध्ये भारत वि. ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळण्यात येत आहे. या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस असून यावेळी भारतीय संघाने डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले. जेव्हा एखादा मोठा क्रिकेटपटू किंवा देशाच्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाबाबत शोक व्यक्त करायचा असतो, तेव्हा भारतीय संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरतो. त्याचप्रमाणे भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी काळी पट्टी बांधून मनमोहन सिंग यांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्याशिवाय भारतीय संघाच्या बऱ्याच माजी खेळाडूंनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग यांनी X या सोशल मीडिया साइटवर याबाबतत पोस्ट केली आहे. तर बीसीसीआयने सुद्धा भारतीय खेळाडूंनी मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ हाताला काळी पट्टी बांधल्याची पोस्ट केली आहे.

- Advertisement -

बीसीसीआयकडून X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत लिहिण्यात आले आहे की, “भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ भारतीय खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली आहे.” तर, माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही पोस्ट करत लिहिले आहे की, “आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. ओम शांती.”

तसेच, भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते भारताच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेणारे एक दूरदर्शी नेते आणि खरे राजकारणी होते. त्यांचा नम्रपणा कायम स्मरणात राहील. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.”

- Advertisement -


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -