घरदेश-विदेशManmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त, 9 मंत्र्यांसह 54...

Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त, 9 मंत्र्यांसह 54 खासदारांचा कार्यकाळ समाप्त

Subscribe

Rajya Sabha : माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेता मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. राज्यसभेत 33 वर्षांची कारकीर्द गाजवल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवृत्त होत आहेत. त्यांच्यासोबतच राज्यसभेच्या 54 खासदारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेता मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. राज्यसभेत 33 वर्षांची कारकीर्द गाजवल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवृत्त होत आहेत. त्यांच्यासोबतच राज्यसभेच्या 54 खासदारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. यापैकी अनेक जण लोकसभा निवडणूक लढवत आहेत, तर काही खासदार असे आहेत ज्यांची पुन्हा राज्यसभेत नियुक्ती होणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग 3 एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. सध्या ते 91 वर्षांचे आहेत. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. (dr manmohan singh retiring from rajya sabha after 33 years tenure)

उदार आर्थिक धोरण राबवणारे अशी ओळख

देशात उदार आर्थिक धोरण राबवणारे अशी ओळख असणारे डॉ. मनमोहन सिंग हे 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले होते. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. (dr manmohan singh retiring from rajya sabha after 33 years tenure)

- Advertisement -

हेही वाचा – Naxalite Encounter : छत्तीसगडमधील 8 तासांच्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

7 केंद्रीय मंत्रीही होतायत निवृत्त

निवृत्त होणाऱ्या 54 खासदारांमध्ये सात केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. यात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर, पशुपालन आणि मत्स्य पालन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचा कार्यकाळही संपतो आहे. यावेळी एल. मुरुगन आणि अश्विनी वैष्णव वगळता अन्य सर्व निवृत्त होत आहेत.

- Advertisement -

मंगळवारी राज्यसभेतून 49 सदस्य निवृत्त झाले तर बुधवारी 5 जण निवृत्त होत आहेत. अशा पद्धतीने एकूण 54 जण निवृत्त होत आहेत. यामध्ये समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी नियुक्त करण्यात आले आहे. (dr manmohan singh retiring from rajya sabha after 33 years tenure)

हेही वाचा – Crime News: क्रिकेट खेळण्यावरून चाकू हल्ला; तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू तर सहा जखमी

मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आता तुम्ही सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत आहात. तीन दशकांहून अधिक काळ देशाची सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात, असे खर्गे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -