Homeदेश-विदेशDr. Manmohan Singh : चलनी नोटेवर स्वाक्षरी असणारे एकमेव पंतप्रधान, कारण...

Dr. Manmohan Singh : चलनी नोटेवर स्वाक्षरी असणारे एकमेव पंतप्रधान, कारण…

Subscribe

तत्पूर्वी, मनमोहन सिंग हे 16 सप्टेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985 या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. भारतीय चलनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी नसते तर, आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी असते.

(Dr. Manmohan Singh) नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते देशाचे एकमेव पंतप्रधान आहेत की, ज्यांची स्वाक्षरी चलनी नोटेवर होती. (The only Prime Minister whose signature is on currency notes)

भारतात 1991मध्ये झालेल्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणांचे श्रेय अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना दिले जाते. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात ते अर्थमंत्री होते आणि त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. मनमोहन सिंग यांनी जेव्हा अर्थमंत्रालयाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारताची वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 8.5 टक्क्यांच्या जवळपास होती. याशिवाय, अत्यावश्यक आयातींसाठी देशाकडे फक्त दोन आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन होते. यावरून देशाची अर्थव्यवस्था त्यावेळी गंभीर संकटात होती, हे स्पष्ट होते.

- Advertisement -

हेही वाचा – Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, राज ठाकरेंची भावांजली

अशा स्थितीत 1991-92च्या केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात एका नव्या आर्थिक युगाची सुरुवात केली. स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. या बजेटमध्ये धाडसी आर्थिक सुधारणा, परवाना राज रद्द करणे आणि खासगी तसेच परदेशी कंपन्यांसाठी अनेक क्षेत्रे खुली करणे अशा निर्णयांचा समावेश होता.

- Advertisement -

तत्पूर्वी, मनमोहन सिंग हे 16 सप्टेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985 या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. भारतीय चलनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी नसते तर, आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी असते. त्यामुळे या काळात छापण्यात आलेल्या चलनी नोटांवर त्यांची स्वाक्षरी असायची. नंतर 2004मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. सन 2014पर्यंत ते या पदावर होते. अशा रीतीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदे डॉ. मनमोहन सिंग यांनी भूषविली. म्हणूनच, भारतीय चलनावर स्वाक्षरी असलेले डॉ. मनमोहन सिंग हे एकमेव पंतप्रधान ठरले. (Dr. Manmohan Singh: The only Prime Minister whose signature is on currency notes)

हेही वाचा – Dr. Manmohan Singh : भावी पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्रोत, शरद पवारांकडून शोकसंवेदना


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -