(Dr. Manmohan Singh) नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दु:ख व्यक्त केले. उपेक्षित समाज, विशेषत: मुस्लिमांच्या उत्थानासाठी काम करणारे ते पहिले पंतप्रधान असल्याचे त्यांनी सांगितले. (Tribute to Manmohan Singh from Owaisi)
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. माझ्या पक्षाच्या वतीने मी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. फाळणीनंतर आलेले ते भारतात आले होते. त्यांनी कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत केली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी विविध पदे त्यांनी भूषविली, असे सांगून ओवैसी म्हणाले की, मागासवर्गीय तसेच मुस्लिम समाजासह भारतातील उपेक्षित लोकांच्या उत्थानासाठी काम करणारे पहिले पंतप्रधान होते, असे माझे मत आहे. त्यांच्या निधनाने देशाने आपला सुपुत्र गमावला आहे.
डॉ. मनमोहन सिंह पहले प्रधानमंत्री थे जिन्होंने पिछड़ों और मुसलमानों को हक़ दिलाने की कोशिशें की थीं।pic.twitter.com/VJTXy2SR7a
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 27, 2024
भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढले – कनिमोझी
डॉ. मनमोहन सिंग हे संसदेचा खूप आदर करणारे पंतप्रधान होते आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढले. त्यांच्या निधनामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, राज ठाकरेंची भावांजली
डॉ. मनमोहन सिंग हे एक उत्कृष्ट राजकारणी आणि आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते. त्यांचे परिवर्तनवादी नेतृत्व आणि दूरदर्शी आर्थिक धोरणांनी भारताला प्रगती तसेच सर्वसमावेशक विकासाकडे नेले. त्यांच्या नम्रतेने आणि बुद्धिमत्तेने भारताच्या संसदीय परंपरांना समृद्ध केले. आर्थिक धोरण, प्रशासन आणि राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. (Dr. Manmohan Singh: Tribute to Manmohan Singh from Owaisi)
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : चलनी नोटेवर स्वाक्षरी असणारे एकमेव पंतप्रधान, कारण…