…तर कोरोना तिसरी लाट येणार नाही आणि डेल्टा प्लसपासून सुरक्षित राहू – डॉ. रणदीप गुलेरिया

dr. randeep guleria says covid third wave may not come if norms are followed and vaccination done properly
...तर कोरोना तिसरी लाट येणार नाही आणि डेल्टा प्लसपासून सुरक्षित राहू - डॉ. रणदीप गुलेरिया

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होणे सुरू आहे. कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि डेल्टा प्लसमुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे. पण आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना तिसरी लाट कशी येणार नाही आणि डेल्टा प्लस व्हेरियंटपासून सुरक्षित कसे राहायचे याबाबत सांगितले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ‘आपले वागणे कसे असेल? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. जर लोकं सावध राहिले आणि लसीकरण चांगल्या प्रमाणात झाले, तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही किंवा आली तरी जास्त प्रभावित नसेल.’

डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत ते म्हणाले की, ‘आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य, अधिक मृत्यूचे आणि प्रतिशक्ती कमी करण्याचे कारण असल्याचा डेटा नाही आहे. परंतु जर आपण कोरोना नियमांचे पालन केले तर आपण कोणत्याही व्हेरियंटपासून सुरक्षित राहू.’

मिक्स लसीच्या डोससंदर्भात डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, ‘मिक्स लसीबाबत अधिक डेटा आवश्यक आहे. याबाबतच्या अध्ययनात सांगण्यात आले आहे की, ज्यामध्ये म्हटले आहे, हे प्रभावी असू शकते. परंतु नेहमीपेक्षा जास्त दुष्परिणाम होऊ शकतात. मिक्स लसीची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला अजून डेटा पाहिजे. काही ठिकाणी पॉझिटिव्हीटी अधिक आहे. या क्षेत्रात अधिक प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे.’


हेही वाचा – Covid-19 Vaccine: खुशखबर! भारतीयांचा युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा; EUचे सात देश आणि स्वित्झर्लंडमध्ये Covishieldला मान्यता