घरताज्या घडामोडी2DG औषध कोरोनावर कसे करते मात? काय आहे किंमत आणि साईड इफेक्ट?...

2DG औषध कोरोनावर कसे करते मात? काय आहे किंमत आणि साईड इफेक्ट? जाणून घ्या सविस्तर

Subscribe

भारतासह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या कोरोनाशी लढण्यासाठी लस ही महत्त्वाची अस्त्र आहे. पण आता कोरोनावर मात करण्यासाठी औषधं आलं आहे. या औषधाचे नाव २ डीऑक्सि-डी ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose) असे असून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) वैज्ञानिकांनी औषधं विकसित केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते या औषधाच्या पहिल्या खेपचे उद्घाटन आज झाले. आता एकूण १० हजार डोस तयार करण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरापासून हायड्रॉक्सीक्लोरिक्विन, रेमडेसिवीर, आयव्हरमेक्टिन सारख्या औषधांच्या कोरोनावरील होणाऱ्या परिणामसंबंधित संशोधन सुरू आहे. परंतु २ डीजी हे पहिले कोरोना प्रतिबंधात्मक औषध म्हणून ओळखले जाते. याच औषधाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

२डीजी कोणी केले विकसित? कोण उत्पादन करणार?

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)च्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) २डीजी औषध विकसित केले आहे. यामध्ये हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरिटरीजच्या (DRL) संशोधकांचे योगदान असून डीआरएल हे औषध सर्वसामान्यांसाठी तयार करणार आहे. पावडरच्या स्वरुपात हे औषध उपलब्ध होणार आहे, जे पाण्यात टाकून प्यायचे आहे.

भारतात जेव्हा गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेला सुरुवात झाली तेव्हा या औषधावर INMAS वैज्ञानिकांना काम सुरू केले होते. मे २०२०मध्ये औषधाच्या फेज-२ क्लिनिकल ट्रायलला DCGI मान्यता दिली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यांपर्यंत हे ट्रायल सुरू होते.

- Advertisement -

कोरोना रुग्णांसाठी सुरक्षित आणि रिकव्हर होण्यास या औषधांची मदत होते, असे ट्रायलमधून समोर आले. त्यानंतर DCGIने नोव्हेंबर २०२०मध्ये औषधाच्या फेज-३ ट्रायलसाठी मंजूरी दिली. अखेरस ट्रायल डेटाच्या आधारावर ९ मे २०२१ला DCGIने २डीजी औषधाला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली.

कोरोनावर कसे काम करते २डीजी औषध?

२डीजी खरं म्हणजे २डीजी अणूचा बदलेला प्रकार आहे, जो ट्यूमर, कॅन्सर पेशींवर उपचारात्मक असतो. ट्रायलमध्ये असे सिद्ध झाले की, २डीजी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास प्रभावी आहेच पण ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांसाठी देखील तितकची प्रभावी आहे.

सध्या दुसऱ्या औषधाप्रमाणे २डीजी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे हे औषध प्राथमिक औषधांमध्ये वापरले जाईल. ग्लूकोजप्रमाणे हे औषध आहे, परंतु ग्लूकोज नाही. शरीरात विषाणू जसा प्रवेश करतो, तसा तो आपल्या प्रती बनविण्यास सुरुवात करतो, यासाठी त्याला ताकद पाहिजे असते, जी ग्लूकोजपासून मिळते.

जेव्हा हे औषध दिले जाते, त्यावेळेस विषाणू हे ग्लूकोज एनालॉग घेईल आणि तेव्हाच त्यात तो अडकेल. यामुळे विषाणू आपल्या प्रती बनवू शकणार नाही म्हणजे त्याचे शरीरातील प्रमाण कमी होईल, असा परिणाम या औषधाचा होईल.

कोरोनाच्या प्रत्येक नव्या व्हेरियंटला हे औषधं रोखेल?

INMAS संचालक डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २डीजी औषध प्रतिकृती बनविणाऱ्या विषाणूला कैद करते. म्हणजेच विषाणूचे कोणतेही व्हेरियंट असो, त्याला खाण्याची गरज पडेल आणि जसा तो आपली भूक भागवण्यासाठी पुढे येईल, तेव्हाच औषध त्याला अडकवेल.

डॉ. मिश्रा पुढे म्हणाले की, हे औषधं घेतल्यानंतर ऑक्सिजनची मागणी वाढते कारण विषाणूची झपाट्याने वाढत असतो. एकदाची ही प्रक्रिया थांबली तर ऑक्सिजन संकट देखील कमी होते.

२डीजी डोस काय असेल? किंमत किती ठेवली आहे?

INMASचे वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांच्या म्हणण्यानुसार, हे औषध एका पाउचमध्ये उपलब्ध होईल. जसे आपण ओआरएस पाण्यात घालून पितो, त्याचप्रमाणे हे पाण्यात घालून प्यायचे आहे. दिवसातून हे औषध दोनवेळा घ्यायचे आहे. कोरोना रुग्णाला पूर्णपणे बरे व्हायचे असले तर ५ ते ७ दिवस हे औषध घ्यावे लागेल.

औषधाच्या किंमतीबाबत अजून काहीही सांगण्यात आलेले नाही आहे. डॉ. चंदना यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी निर्णय घेईल. पण औषध परवडण्यासारखे असेल पाहिजे, हे लक्षात ठेवले जाईल. परंतु सुत्रांच्या माहितीनुसार या औषधाच्या एका पॉकेटची किंमत ५०० ते ६०० रुपये दरम्यान असेल.

२डीजी औषधाचा काही साईड इफेक्ट्स?

या औषधाच्या साईट इफेक्टबाबत डॉ. चंदाना यांनी सांगितले की, ट्रायल दरम्यान, सामान्य आणि गंभीर रुग्णांना हे औषध देण्यात आले. सर्व रुग्णांना या औषधाचा फायदा झाला असून कोणावरही औषधाचा साईड इफेक्ट झाल्याचे पाहायला मिळाले नाही.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -