घरताज्या घडामोडीDRDOचे 2-DG औषध कोणाला द्यावे? कोणाला देऊ नये? वाचा

DRDOचे 2-DG औषध कोणाला द्यावे? कोणाला देऊ नये? वाचा

Subscribe

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी २ डीऑक्सी-डी-ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose) औषध विकसित केले असून या औषधाला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे सध्या या औषधाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जसे की, कोणता रुग्ण हे औषधं घेऊ शकतो? कशा प्रकारे रुग्णांवर याचा वापर करायचा? यामुळे रुग्णांना किती फायदा होईल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या औषधाच्या वापराबाबत डीआरडीओने निर्देश जारी केले आहेत. डीआरडीओने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट करून हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीखाली कोरोना रुग्णांना दिले जाऊ शकते असा दावा केला आहे.

हेही वाचा – 2DG औषध कोरोनावर कसे करते मात? काय आहे किंमत आणि साईड इफेक्ट? जाणून घ्या सविस्तर

- Advertisement -

डीआरडीओने हे औषध हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरिटरीसोबत मिळून तयार केले आहे. हे औषध एका पाउचमध्ये उपलब्ध असणार आहे. जसे आपण ओआरएस पाण्यात घालून पितो, त्याचप्रमाणे हे पाण्यात घालून प्यायचे आहे. दिवसातून हे औषध दोनवेळा घ्यायचे आहे. कोरोना रुग्णाला पूर्णपणे बरे व्हायचे असेल तर ५ ते ७ दिवस हे औषध घ्यावे लागणार आहे, असे INMASचे वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांनी सांगितले होते. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमी असेल त्याच्यासाठी हे औषध एक वरदानच्या स्वरुपात असेल.

- Advertisement -

2-DG औषध कोणाला द्यावे? कोणाला देऊ नये?

  • डीआरडीओने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाद्वारे मान्य झालेले निर्देश जारी केले आहेत. यानुसार जे कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, त्या रुग्णांना हे औषध दिले जाऊ शकते.
  • हे औषध कोरोबाधिताला पहिल्या १० दिवसांच्या आत किंवा त्यापूर्वी दिले पाहिजे.
  • अनियंत्रित मधुमेह, गंभीर ह्रदयरोगाचे रुग्ण, एआरडीएस, गंभीर यकृताचा त्रास आणि मुत्र विकार असलेल्या रुग्णांवर आतापर्यंत २ डीजी औषधाची चाचणी केली नाही आहे. त्यामुळे या रुग्णांना हे औषध दिले नाही पाहिजे.
  • तसेच २ डीजी औषध गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना दिले नाही पाहिजे. याशिवाय १८ वर्षांखालील किशोरवयीन मुलांना देखील हे औषध नाही दिले पाहिजे.
  • जर रुग्णांना किंवा कुटुंबातील सदस्यांना हे औषध पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या रुग्णालयाला औषध पुरवण्यासाठी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबशी संपर्क करण्यासाठी सांगावे.

हेही वाचा – Coronavirus in China: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; ग्वांगझोउमध्ये केलं लॉकडाऊन


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -