घरCORONA UPDATEDRDO च्या DIPCOVAN किटने तपासता येणार अँटीबॉडी, केंद्राने दिली मंजूरी

DRDO च्या DIPCOVAN किटने तपासता येणार अँटीबॉडी, केंद्राने दिली मंजूरी

Subscribe

किट निर्मितीसाठी १ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले होते.

डीआरडीओ (DRDO) लॅबने अँटीबॉडी डिक्टेशन किट DIPCOVAN तयार केले आहे. या किटच्या साहाय्याने शरीरातील अँटीबॉडीची वाढ, तसेच SARS-CoV-2 विषाणूमधील nucleocapsid प्रोटिनचा शोध लावण्यासाठी मदत होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती डीआरडीओने दिली आहे. दिल्लीतील Vanguard Diagnostics Pvt Ltd कंपनीसह मिळून या किटची निर्मिती करण्यात आली आहे.

- Advertisement -

DIPCOVAN या अँटीबॉडी डिटेक्शन किटच्या साहाय्याने रुग्णांना आता कोरोनाविषाणूविरोधात लढण्यास आणखी बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे या किटची निर्मिती भारतीय संशोधकांनी केली असल्याने हे किट मेड इन इंडिया आहे. या किटच्या निर्मितीसाठी दिल्लीतील विविध रुग्णालयांमधील १ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले होते.

- Advertisement -

या अँटीबॉडीज डिटेक्शन किटला ICMR कडून एप्रिल महिन्यात मंजूरी मिळाली आहे. परंतु त्यापूर्वीच या किटच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती. यानंतर मे २०२१ रोजी डीसीजीआय, CDSCO, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून या किटच्या विक्री आणि वितरणासाठी मंजुरी मिळाली आहे.


एलपीजी गॅस सिलेंडर विक्रीतून सरकार देतयं कमाईची संधी, देशात सुरु होणार १ लाख केंद्र


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -