घरक्राइमDRDO च्या वैज्ञानिकाला लेडी मसाज पार्लर पडलं महागात, झाला किडनॅप!

DRDO च्या वैज्ञानिकाला लेडी मसाज पार्लर पडलं महागात, झाला किडनॅप!

Subscribe

समाजातल्या उच्चभ्रू वर्गात असलेली मसाजची क्रेझ पाहाता याचा गैरफायदा उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रिया झाल्याच्या अनेक घटना आपण पाहात असतो. अशीच एक घटना नुकतीच दिल्लीमध्ये उघड झाली आहे. यामझ्ये चक्क DRDO चे एक वैज्ञानिकच अडकल्याचं समोर आलं आहे. या वैज्ञानिकाला संबंधित मसाज पार्लरमध्ये बॉडी मसाज न मिळता मारहाण आणि लुटीचा सामना करावा लागला. इतकंच नाही, तर वैज्ञानिकाला पार्लरमध्ये सुरुवातीला भुलवणाऱ्या दोन तरुणींसोबत तीन जणांनी त्याचं अपहरण देखील केलं. वैज्ञानिकाच्या पत्नीने अखेर पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या तपास पथकानं शिताफीने या टोळक्याचा शोध लावला आणि वैज्ञानिकाला सोडवलं. नवभारत टाईम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. पण या प्रकरणामुळे वैज्ञानिकाला मात्र जन्माची अद्दल घडली!

हा सगळा प्रकार घडला दिल्लीमध्ये…

दिल्लीच्या DRDO कार्यालयात तैनात वैज्ञानिकाचं अपहरण झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री उशिरा समोर आला. हे वैज्ञानिक दिल्लीच्या सुपरटेक केपटाऊन सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत राहातात. शनिवारी संध्याकाळी ते ऑनलाईन आसपास असलेल्या मसाज पार्लरचा शोध घेत होते. यावेळी त्यांना सेक्टर ३५च्या सिटी सेंटरमध्ये एक मसाज पार्लर असल्याचं समजलं. त्यामुळे संध्याकाळीच ते या मसाज पार्लरमध्ये पोहोचले!

- Advertisement -

सेक्टर ३५ च्या या मसाज पार्लरमध्ये…

दोन तरुणींनी सुरुवातीला त्यांचं स्वागत केलं. त्यांना मसाज सेंटरमध्ये घेऊन गेल्यानंतर लगेच या दोन तरूणींसोबत इतर तीन जणांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्याकडची रोकड आणि मोबाईल काढून घेतला आणि त्यांचं अपहरण करून त्यांना गाडीत घालून घेऊन गेले. रात्री उशिरा या टोळक्यानं वैज्ञानिकाच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला फोन केला. खंडणीची मागणी केली.

पत्नीने प्रसंगावधान दाखवून…

या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांची सूत्र वेगानं फिरली आणि मोबाईल ट्रेसिंग सुरू झालं. सेक्टर ४९ च्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार शोध सुरू केला. २४ तास सुरू असलेल्या शोधानंतर अखेर दिल्लीच्या सेक्टर ३५ मधून पोलिसांनी हे वैज्ञानिक आणि त्यांच्यासोबत असलेल्या तिघा आरोपींचा शोध लावला. वैज्ञानिकाला सकुशल सोडवण्यात आलं असून या तिघांना पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -