घरदेश-विदेशश्रीनगरमध्ये ड्रोनवर बंदी

श्रीनगरमध्ये ड्रोनवर बंदी

Subscribe

ड्रोनच्या खरेदीवरही पूर्णपणे बंदी, जिल्हाधिकारी मोहम्मद एजाज यांनी जारी केला आदेश

जम्मूत हवाई दलाच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. या घटनेला एक आठवडा उलटल्यानंतर आता प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे.

ड्रोनच्या खरेदीवरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच ज्यांच्याकडेही ड्रोन आहेत त्यांनी लवकरात लवकर ते पोलीस ठाण्यात जमा करावेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. ज्यांच्याकडे ड्रोन कॅमेरा किंवा हवाई संबंधी इतर यंत्र सामग्री आहे त्यांनी ती पोलिसांकडे जमा करावी, असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद एजाज यांनी जारी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -