Drone Delivery : ‘या’ पाच शहरात होणार ऑनलाइन फूडची ड्रोन डिलिव्हरी

काही दिवसांनी तुम्ही काही ऑनलाईन फूड ऑर्डर कराल आणि तुमचे दार ड्रोन ठोठावेल तेव्हा तुम्ही अजिबात आश्चर्यचकित होण्याची गरज नाही.कारण काही शहरात ऑनलाइन फूडची होम डिलिव्हरी करण्यासाठी ड्रोन सज्ज झाले आहेत. हे थोड्याच दिवसांत सत्यात उतरणार आहे.

Drone Delivery: Drone delivery of food will be done online in these five cities
Drone Delivery : 'या' पाच शहरात होणार ऑनलाइन फूडची ड्रोन डिलिव्हरीDrone Delivery : 'या' पाच शहरात होणार ऑनलाइन फूडची ड्रोन डिलिव्हरी

हल्ली प्रत्येकजण ऑनलाइन फूड डिलिव्हरी करण्यासाठी आग्रही असतो. या ऑनलाईन फुड डिलिव्हरीसाठी स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही फूड डिलिव्हरी अॅपमधून नेहमीच काहीना काहीतरी मागवत असतात. काही दिवसांनी तुम्ही काही ऑनलाईन फूड ऑर्डर कराल आणि तुमचे दार ड्रोन ठोठावेल तेव्हा तुम्ही अजिबात आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण काही शहरात ऑनलाइन फूडची होम डिलिव्हरी करण्यासाठी ड्रोन सज्ज झाले आहेत. मात्र, हे थोड्याच दिवसांत सत्यात उतरणार आहे. कोणत्याही डिपार्टमेंटल स्टोरमधून काही ऑर्डर केल्यास ती ऑर्डर घेऊन एक ड्रोन तुमच्या घरी येणार आहे. ड्रोनने डिलिव्हरी करण्यासाठी अनेक कंपन्या आपले ड्रोन तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘ही’ कंपनी या शहरांमध्ये 200 ड्रोन लॉन्च करत आहे

लास्ट माईल डिलिव्हरी कंपनी Zypp इलेक्ट्रिकने गेल्या आठवड्यात सांगितले की, ते ड्रोन लॉजिस्टिक क्षेत्रात प्रवेश करण्यास तयार आहे. आतापर्यंत, इलेक्ट्रिक वाहनाद्वारे वितरण करणार्‍या कंपनीने ड्रोनद्वारे वस्तू वितरीत करण्यासाठी TSAW ड्रोनशी करार केला आहे. कंपनी पहिल्या टप्प्यात 200 ड्रोन बाजारात आणणार आहे. हे ड्रोन सध्या दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि पुणे येथे वितरित करण्यात येणार आहे.

TSAW ही कंपनी ड्रोन डिलिव्हरीसाठी ड्रोन तयार करते. कंपनीने यापूर्वीच अनेक ड्रोन तयार केले आहेत, जे खास डिलिव्हरीसाठी विकसित केले गेले आहेत.सध्या डिलिव्हरीसाठा लॉन्च करण्यात आलेल्या सर्व ड्रोनमध्ये स्मार्ट लॉकर्स असतील. हे ड्रोन केवळ दुर्गम भागातच नाही तर शहरांमधील अपार्टमेंटमध्येही फूड डिलिव्हरी करणार आहेत. याशिवाय, डिलिव्हरी ड्रोनमध्ये रिमोट-आयडी आणि डिटेक्ट एंड अवॉइड यासारख्या नवीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरुन, हे ड्रोन कोणत्याही उडत्या गोष्टीशी टक्कर होण्यापासून वाचू शकते.


हेही वाचा – Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट, केंद्राचा मोठा निर्णय