घरताज्या घडामोडीराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मूंच्या गावात मिठाईची तयारी, विजय निश्चित?

राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मूंच्या गावात मिठाईची तयारी, विजय निश्चित?

Subscribe

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. आज (गुरूवार) या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज पूर्ण होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निकालानंतर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. परंतु एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या घोषणेपूर्वी त्यांच्या विजयाच्या मिरवणुकीची तयारी सुरू झाली आहे.

द्रौपदी मुर्मूंचं मूळ गाव असणाऱ्या ओडिशाच्या रायरंगपूर या गावात मठाईची तयारी केली जात आहे. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास रायरंगपूरच्या जनतेला आहे.

- Advertisement -

द्रौपदी मुर्मूंच्या गावातील लोकांनीही या निमित्ताने आदिवासी नृत्य आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एका स्थानिक ग्रामस्थाने सांगितले की, आजचा दिवस त्यांच्या गावासाठी तसेच संपूर्ण ओडिशासाठी अभिमानास्पद आहे. आज पहिल्यांदाच एक आदिवासी महिला या देशाच्या राष्ट्रपती पदावर पोहोचणार आहे. या आनंदोत्सवानिमित्त २० हजार लाडूंचे वाटप करण्यात आले आहे. यासोबतच फटाक्यांची आतषबाजी आणि नृत्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे बॅनरही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

द्रौपदी मुर्मू ज्या शाळेत लहानपणी शिकल्या. त्या शाळेचे मुख्याध्यापक बिश्वेश्वर मोहंती म्हणाले की, ती एक गुणवान विद्यार्थीनी होती आणि तिला लोकांची सेवा करायची होती. द्रौपदी मुर्मू शाळेत शिकत असताना 1968 ते 1970 पर्यंत ते मुख्याध्यापक होते. ते म्हणाले की, द्रौपदी मुर्मूंबद्दल ऐकून मला खूप अभिमान वाटतो. ती हुशार विद्यार्थीनी होती. मला आठवतंय की एकदा विद्यार्थ्यांना भविष्यात काय बनायचे आहे याबद्दल मी प्रश्न विचारला होता.

- Advertisement -

दरम्यान, दिल्लीच्या संसद भवनात मतमोजणी होणार असल्याने सर्व तयारी झाली आहे. खोली क्रमांक 63 मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मतदान पार पडले. त्याच खोलीत ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत.


हेही वाचा : कोरोनामुक्तीनंतर सोनिया गांधी ईडी चौकशीसाठी हजर राहणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -