घरताज्या घडामोडीराष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूं यांच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूं यांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

Subscribe

राष्ट्रपती पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी संसद भवनात एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूही संसद भवनात उपस्थित होत्या. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी एक वक्तव्य केले होते.

राष्ट्रपती पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी संसद भवनात एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूही संसद भवनात उपस्थित होत्या. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. (droupadi murmu tells nda meet there are 10 crore tribal all delighted with her nomination as presidential candidate president)

निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, भाजप खासदार हेमा मालिनी आणि अन्य नेतेही या बैठकीला उपस्थित होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, राष्ट्रपतीपदाची उमेदवाी मिळाल्यानंतर आदिवासी, महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १० कोटी आदिवासी असून, त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिळाल्याने सर्वांच आनंदी आहेत.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे त्यांच्या निवासस्थानी राज्यसभेतील नेत्यांची बैठक घेत आहेत.

- Advertisement -

विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. काही तासाभरापासून ही बैठक सुरू होती. या बैठकीनंतर शरद पवारांनी मार्गारेट अल्वांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी सत्तासंघर्षादरम्यान फडणवीसांना फोन केला नाही, शिवसेनेने फेटाळली चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -