LIVE UPDATES: मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये झाली संजय राऊत-फडणवीस भेट!

News Live Update

मुंबईत एकीकडे बॉलिवुडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुंबईतच नव्हे, तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची तयारी सुरू झाल्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याचं समोर आलं आहे. (सविस्तर वाचा)


राज्य सरकारमधील कित्येक मंत्री व विधानसभा अध्यक्षांनंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ते क्वारंटाइन झाले आहेत. ‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे. ‘लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (सविस्तर वाचा)


पुणे येथील जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली ३३ वर्षीय महिला अखेर शनिवारी पिरंगुटच्या घाटात सापडली. संबंधित महिला सुरक्षित असून सध्या कुटुंबीयांसमवेत आहे. प्रिया गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. य संदर्भात बातम्या प्रसारीत झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे.

प्रिया गायकवाड यांना ५ तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली. तिकडेच बेवारस राहत होती. पण ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईनं पोलिसांत देताच माध्यमातूनही यासंबंधीच्या बातम्या प्रसारीत झाल्या आणि अखेर शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध लागला.


अभिनेत्री सारा अली खान तब्बल चार तासानंतर मुंबईतील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या विभागीय कार्यालयातून बाहेर पडली आहे.


अभिनेत्री दीपिका पदुकोण एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली असून श्रद्धा आणि सारा यांची अजूनही चौकशी सुरू आहे.


धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माते क्षितिज रवी प्रसाद यांना ड्रग्ज तपासणीच्या संदर्भात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक केली जाणार आहे. यासंबंधीत कागदोपत्री औपचारीकता पूर्ण केली जात आहे.


मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : शासनाच्या घोषणा पत्रकांची होळी

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील निर्णायक दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीला नाशिकमध्ये सुरूवात झाली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील औरंगाबाद रोडवरील मधुरम बँक्वेट हॉल मध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी मराठा समाजाकडून राज्यसरकारनं केलेल्या ८ घोषणांच्या पत्रकांची होळी करण्यात आली. यावेळी शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. (सविस्तर वाचा)


साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे देखील सांगितले जात आहे. यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक प्रकृती खालवल्याने त्यांच्या वर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. (सविस्तर वाचा)

मोहन यादव

अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली असून यापूर्वीच दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर येथे उपस्थित आहेत.


दीपिका पदुकोणनंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. एनसीबीचे अधिकारी दोघींचीही चौकशी करत आहेत.


अभिनेत्री दीपिका पदुकोण एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली असून तिला बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावले होते.


देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ८५ हजार ३६२ इतक्या नव्या रुग्णांची वाढ झाली असून १ हजार ०८९ मृत्यूची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत देशभरात ५९ लाख ०३ हजार ९३३ इतके कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९ लाख ६० हजार ९६९ इतके अॅक्टिव्ह केसेस असून ४८ लाख ४९ हजार ५८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये ९३ हजार ३७९ जणांच्या मृत्युची नोंद आहे.


देशात आतापर्यंत ७ कोटी ०२ लाख ६९ हजार ९७५ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच काल, २५ सप्टेंबर रोजी १३ लाख ४१ हजार ५३५ इतक्या चाचण्या करण्यात असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


दिल्लीत काल रात्री नरेला येथील एका कारखान्यात भीषण आग लागली. घटनास्थळी २६ अग्निशामक दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. अद्यापही आग विझवण्याचे काम सुरू आहे.


सुशांत सिंह राजपुत मृत्यूप्रकरणाचा तपास ड्रग्ज अँगलने सुरू आहे. यामुळे अनेक बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रित सिंग, सीमोन खंबाटा अशा अनेकांचे ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. त्यात एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज पेडलर करमजीतने आणखी खुलासे केले आहेत. दरम्यान, आज दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशीकडून चौकशी होणार आहे.