घरताज्या घडामोडीचेन्नई विमानतळावर तब्बल 100 कोटींचे ड्रग्ज जप्त, सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई

चेन्नई विमानतळावर तब्बल 100 कोटींचे ड्रग्ज जप्त, सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई

Subscribe

चेन्नई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 100 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. इथोपियातून आलेल्या एका विमान प्रवाशाकडून 100 किलो वजनाचे कोकेन आणि हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या अंमली पदार्थांची किंमत बाजारात 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. इथिओपियाच्या आदिस अबाबा येथून शुक्रवारी चेन्नईला आलेल्या इथिओपियन एअरलाइन्सच्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. दरम्यान या तपासणीत इक्बाल बी उरंदडी या 38 वर्षीय भारतीय प्रवाशाकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

हवाई गुप्तचर युनिटचे अधिकारी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. आफ्रिकेतून येणाऱ्या कुठल्यातरी व्यक्तीकडे अंमली पदार्थांचा साठी असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र, ज्यावेळी इक्बाल या भारतीय प्रवाशाची तपासणी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सीमा शुल्क विभागाने त्याची चौकशी केल्यानंतर सुमारे 100 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

किती किलोचे सापडले अमली पदार्थ?

- Advertisement -

सीमा शुल्क विभागाने चौकशी केल्यानंतर जवळपास साडे नऊ किलोचे कोकेन आणि हेरॉईन अधिकाऱ्यांना सापडले आहे. तसेच इक्बालची कसून चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. एनडीपीएस कायद्यानुसार हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात एका टांझानियन प्रवाशाकडून 8.86 कोटींचे हेरॉईन चैन्नई विमानतळावरच जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता ऑगस्टमध्ये ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.


हेही वाचा : सीमावादावर परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, चीन शांततेचा भंग करत असेल तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -