घरदेश-विदेशहिंदी महासागरात जहाजातून तब्बल 25,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; NCB ची कारवाई

हिंदी महासागरात जहाजातून तब्बल 25,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; NCB ची कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) आणि भारतीय नौदल यांनी संयुक्त कारवाई करताना हिंदी महासागरातून शनिवारी (13 मे) विशेष कारवाई करताना 25,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, उच्च दर्जाच्या मेथॅम्फेटामाइनची मोजणी पूर्ण झाली असून एकूण 2,525 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले आहे आणि याची किंमत अंदाजे 25,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

एनसीबीने भारतीय नौदलाला सोबत घेत भारतीय जल हद्दीतून सुमारे 2,500 किलो प्रतिबंधित मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त करण्यात आलेले मेथॅम्फेटामाइन हे उच्च दर्जाचे आहे. ते 134 गोण्यांमध्ये एक किलोच्या पाकिटात ठेवण्यात आले होते. याप्रकरणी एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

उपमहासंचालक संजय कुमार सिंह यांनी सांगितले की, आर्थिक मूल्याच्या दृष्टीने देशातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. एनसीबी आणि नौदलाने हिंदी महासागरात यशस्वी ऑपरेशन केले. इराणमधील चाबहार बंदरातून या ड्रग्जची उत्पत्ती झाली असली तरी स्रोत पाकिस्तान आहे. हे जहाज समुद्रातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते. वेगवेगळ्या देशांतून छोट्या बोटी मुख्य जहाजांमधून माल गोळा करायच्या आणि श्रीलंका, मालदीव आणि भारतापर्यंत पोहचवायच्या. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली होती आणि या कारवाईत एनसीबी पथकाने सुमारे 4,000 किलो विविध ड्रग्ज जप्त केले आहेत.

संजय कुमरा सिंह यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2022 मध्ये ऑपरेशन समुद्रगुप्त सुरू करण्यात आले. ‘समुद्रगुप्त’ ऑपरेशनचे प्रारंभिक यश फेब्रुवारी 2022 मध्ये प्राप्त झाले. एनसीबी आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त पथकाने 529 किलो चरस, 221 किलो मेथॅम्फेटामाइन आणि 13 किलो हेरॉईन खोल समुद्रात जप्त केले. हे सर्व ड्रग्ज गुजरात, बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आयात करण्यात आले होते. ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ च्या जप्तीच्या भागामध्ये अफगाणिस्तानातून येणार्‍या ड्रग्जच्या सागरी तस्करीला लक्ष्य करण्यात आले होते.

- Advertisement -

2022 मध्ये ऑपरेशन समुद्रगुप्त सुरू झाले
हिंद महासागर क्षेत्रात हेरॉइन आणि इतर मादक पदार्थांच्या सागरी तस्करीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका ओळखून, एनसीबीचे महासंचालक संजय कुमार सिंह यांच्याकडे ऑपरेशन समुद्रगुप्तचे  नेतृत्व देण्यात आले आणि इतर एनसीबी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. या ऑपरेशन काम होते की, अंमली पदार्थ वाहून नेणाऱ्या जहाजांना रोखण्यासाठी कारवाई करण्यायोग्य माहिती गोळा करणे हे प्राथमिक उद्दिष्ट होते. या कार्यासाठी समुद्रगुप्तच्या टीमने डीआरआय, एटीएस गुजरातसारख्या ड्रग्ज कायदा अंमलबजावणी संस्था आणि भारतीय नौदलाच्या इंटेलिजन्स विंग, एनटीआरओ इत्यादी गुप्तचर संस्थांशी संवाद साधून माहिती गोळा केली जायची.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -