घरदेश-विदेशमद्यधुंद महिलेचा विमानात धिंगाणा, क्रूला मारहाण करून स्वत:च्या अंगावरील कपडे उतरवले

मद्यधुंद महिलेचा विमानात धिंगाणा, क्रूला मारहाण करून स्वत:च्या अंगावरील कपडे उतरवले

Subscribe

नवी दिल्ली : विमानात महिलेवर लघुशंका केल्याच्या लाजिरवाण्या कृत्यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अबुधाबीहून मुंबईला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या (UK 256) फ्लाइटमध्ये मद्यधुंद एका 45 वर्षीय महिला प्रवाशाने केबिन क्रूवर हल्ला केला.

विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातील ही मद्यधुंद महिला प्रवासी आपल्या सीटवरून उठली आणि बिझनेस क्लासच्या सीटवर बसू लागली, तेव्हा क्रू मेंबर्सनी त्याला आक्षेप घेतला आणि तिला सीटवरून उठण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या त्या महिलेने एका क्रू मेंबरच्या तोंडावर ठोसा मारला. त्याचवेळी अन्य क्रू मेंबरने रोखण्याचा प्रयत्न केला असता ती महिला त्या मेंबरवर थुंकली. नंतर, तिने आपल्या अंगावरील कपडे काढले आणि विमानात इकडे तिकडे फिरू लागली. या मद्यधुंद महिलेने क्रू मेंबर्सना शिवीगाळही केली.

- Advertisement -

एअरलाइन कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विमानात गोंधळ घालणे आणि क्रू मेंबरला मारहाण करणे, याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली. तसेच, तिला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. नंतर या महिलेची जामिनावर सुटका करण्यात आली. ही महिला प्रवासी इटलीची असून तिचे नाव पाओला पेरुचियो आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

या महिलेने आपले कपडे उतरवल्यानंतर विमानातील गोंधळ वाढला. कॅप्टनच्या सूचनेनंतर तिला पकडून कपडे घालण्यात आले आणि नंतर विमान उतरेपर्यंत सीटवर बांधून ठेवले. मुंबई पोलिसांनी या महिलेचा पासपोर्ट जप्त केला असून तिला अंधेरी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपपत्र दाखल केले. तथापि, महिलेला जामीन मिळाला आहे.

चालक दल आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर महिलेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपआयुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या प्राथमिक अहवालात ती प्रवासादरम्यान दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती सहार पोलिसांनी दिली. केबिन क्रू मेंबर एल एस खान यांनी या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनाच या महिलेने मारहाण केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -