घरदेश-विदेशमद्यधुंद अवस्थेत तरुणांनी विमानात घातला गोंधळ, एअर होस्टेसशी गैरवर्तन

मद्यधुंद अवस्थेत तरुणांनी विमानात घातला गोंधळ, एअर होस्टेसशी गैरवर्तन

Subscribe

Indigo Airlines | तिन्ही आरोपींनी विमानतळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना स्थानिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

एअर इंडियाच्या विमानात एका महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याच्या घटनेने संपुर्ण देशभरात खळबळ माजली होती. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार ताजा असतानाच इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विमानात मद्यधुंद तरुणांनी विमानातील महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांना अटक केली आहे.

दिल्लीहून पाटण्यासाठी निघालेल्या इंडिगोच्या विमानात रोहित कुमार, नितीन कुमार आणि पिंटू कुमार प्रवास करत होते. यावेळी त्यांनी मद्यधुंद अवस्थेत विमानातच गोंधळ घातला. सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. मात्र, मद्यधुंद तरुणांनी या महिला कर्मचाऱ्यांनाच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे हे विमान पाटण्यात उतरल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफच्या पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. यावेळी तिन्ही आरोपींनी विमानतळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना स्थानिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महिलेच्या अंगावर लघुशंका; आरोपी मिश्राने स्वत:च दिली कबुली, म्हणाला…

त्या आरोपीची कबुली

- Advertisement -

एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना २६ नोव्हेंबर २०२२ रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी मुंबईतील आरोपी शंकर मिश्रा याला अटक करण्यात आली होती. न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेनंतर मिश्रा हा फरार होता. दिल्ली पोलिसांनी त्याला शनिवारी सकाळी बंगळुरूमधून अटक केली. मात्र, माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा मुलगा ७२ वर्षीय महिलेशी गैरवर्तणूक करू शकत नाही, असा दावा आरोपी शंकर मिश्राच्या वडिलांनी केला होता.

या घटनेतील आरोपी शंकर मिश्रा याने पोलिसांना कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिश्रा दारूच्या नशेत होता. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण न राहिल्याने त्याच्या हातातून हे कृत्य झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ‘मी जे काही केले त्या बाबत सर्व लिखित स्वरूपात दिल्याचे देखील त्याने सांगितले. त्याने लिहिलेली दोन पानी खुलासा असलेले पत्र देखील त्याने पोलिसांना दाखवले आहे. मी या प्रकरणात निर्दोष आहे असे देखील त्याने म्हटले आहे. मला फोन बेल मिळेपर्यंत बंद करण्यास सांगितले होते’, असेही शंकर मिश्रा याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -