लखनऊ : तर्रर्र दारुच्या नशेत असलेल्या एका भाजपच्या नेत्यांने रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. एवढेच नाही तर पत्रकारालाही अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर मात्र, पत्रकाराच्या पत्नीने त्या नेत्याच्या कानाखाली लगावली. हा सगळा प्रकरा उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील असून, याप्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.(Drunkenness oral obscene language BJP leaders high voltage drama in the middle of the road)
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील राजाजीपुरा क्षेत्रातील ई ब्लॉकमधील एका रस्त्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने रस्त्याच्या मधोमध कार उभी केली. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. याचवेळी एका पत्रकाराने हॉर्न वाजवत गाडी बाजुला करण्याचे सांगितले. मात्र, तसे झाले नाही. तेव्हा त्या पत्रकाराने खाली उतरून गाडी बाजुला करण्याची विनंती केली असता त्यावेळी बीजेपीच्या त्या नेत्याने पत्रकारालाच शिवीगाळ केली.
हेही वाचा : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची टीका म्हणाले; “शरद पवार भाजपचे…”
पत्रकाराच्या पत्नीने लगावली कानशिलात
पत्रकार आणि भाजपाचा नेता या दोघांमध्ये तब्बल 20 मिनीट वाद सुरु होता. यावेळी त्या बीजेपीच्या नेत्याने पत्रकाराला शिवीगाळ करून एकवेळ त्याच्यावर मारण्यासाठीही धाऊन गेला. यावेळी मात्र, पत्रकाराच्या बायकोने थेट त्या भाजप नेत्याच्या कानशिलातच लगावली. यावेळी उपस्थितांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
हेही वाचा : आमदार अपात्रता प्रकरणात वेळकाढूपणा का करताय? सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सुनावले
‘त्या’ नेत्याने आरोप फेटाळले
घडलेल्या घटनेबाबत त्या भाजपाच्या नेत्याने सांगितले की, ते कॅन्सर पीडित रुग्णाला भेटण्यास जात होते. मात्र, यावेळी पत्रकाराने त्या परिसरातील डॉक्टरांना फोन करुन विचारले असता त्या परिसरातील कुठल्याच रुग्णालयात कॅन्सरचा रुग्ण नसल्याची माहिती मिळाली. मात्र, याप्रकरणी त्या पत्रकाराने पोलिसांत तक्रार दिली असून, त्यावर गुन्हा दाखल झाला नाही हे विशेष.
घटनेबाब केला त्या नेत्याने खुलासा
घटनेतील भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे नाव अतुल दीक्षित असून, त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीला हाड आणि रक्ताचा कर्करोग आहे ज्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे. डॉक्टरांकडून ही माहिती मिळाल्यानंतर ते खूप अस्वस्थ झाले. डॉक्टरांनी त्यांना लोहिया किंवा पीजीआयमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र काल विश्वकर्मा पूजेमुळे त्यांना प्रवेश घेता आला नाही आणि या सर्व गोष्टींमुळे ते चिंतेत होते. तसेच ज्या रस्त्यावर हा वाद झाला तो रस्ता अतिशय अरुंद असून पुढे वाहने उभी होती, त्यामुळे त्याला पुढे जाता येत नव्हते आणि याच दरम्यान हा वाद झाला. ते सांगतात की, जेव्हा रस्त्यावरून वाहन हटवण्याबाबत चर्चा झाली तेव्हा ते गाडी पार्क करण्याचा प्रयत्न करत होते पण रस्त्यावर इतर वाहने असल्याने आणि अरुंद गल्लीमुळे त्यांना गाडी उभी करता आली नाही म्हणून हा प्रकार घडल्याचा खुलास त्यांनी केला.