हरियाणात खाण माफियांनी डीएसपीला वाहनाखाली चिरडून मारले

DSP crushed to death by mining mafia mowed down by dumper in Nuh haryana

हरियाणाच्या नुहमध्ये खाण माफियांकडून दिवसाढवळ्या कायद्याची पालमल्ली करत दहशत माजवली जात आहे. यात पोलिसांच्या कारवाईला झुगारून देत या खाण माफियांचे मनोबल किती उंचावलेय हे मंगळवारच्या एका घटनेतून दिसून आले. खाण माफियांच्या गुंडांनी अवैध खाणकामाविरोधातील कारवाईसाठी आलेल्या डीएसपी सुरेंद्र सिंग यांची निर्घृण हत्या केली आहे, खाण माफियांनी डीएसपींच्या अंगावर डंपर चढवला, ज्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुग्रामला लागून असलेल्या नूह जिल्ह्यातील तवाडू पोलीस स्टेशन हद्दीतील पाचगाव गावात घडली आहे.

डीएसपी (तावडू) सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना गावालगतच्या अरवली टेकडीवर अवैध खाणकाम सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हिसारचे रहिवासी असलेले डीएसपी मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास टीमसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलीस पथकाला पाहताच टेकडीजवळ उभे असलेले डंपर चालक आणि खाणकाम करणारे कामगार पळू लागले. दरम्यान डीएसपी वाहन थांबवण्यासाठी पुढे आले असता डंपर चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी वाहनाखाली चिरडून डीएसपींचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच एसपी नूह वरुण सिंगला घटनास्थळी पोहोचले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेमारी सुरु असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अरावलीच्या डोंगराळ भागात खाण उत्खननावर बंदी घालण्यात आली. असे असूनही खाण माफियांकडून राजरोजपणे कायद्याला बगल देत अवैध्य खाण उत्खनन सुरु आहे. या अवैध्य खाणकामात अनेक व्हाईट कॉलरही सामील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता डीएसपीच्या हत्येनंतर अवैध खाणकामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा कुर्‍हाडीने खून करून घाटात फेकल