Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश दुबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षाची धडक, 160 प्रवासी थोडक्यात बचावले

दुबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षाची धडक, 160 प्रवासी थोडक्यात बचावले

Subscribe

नवी दिल्ली : मंगळुरूहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षाने धडक दिल्यानंतर मोठा अपघात टळला आहे. पक्षी धडकल्यानंतर इंडिगोच्या विमानातून प्रवास करणाऱ्या 160 हून अधिक प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर हे विमान एप्रनकडे वळवण्यात आले. (Dubai-bound IndiGo flight hits bird, 160 passengers narrowly escape)

मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mangalore International Airport) इंडिगोचे विमान 6E 1467 IXE-DXB धावपट्टीवर ड्डाणासाठी तयार होते. यावेळी धावपट्टीवरून जात असताना सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर ज्याठिकाणी सर्व विमाने उभी असतात त्याठिकाणी इंडिगोच्या विमानाला एप्रनकडे वळवण्यात आले. या विमानाची तांत्रिक तज्ज्ञ तपासणी करत आहेत. यानंतर,  प्रवाशांना बंगळुरूहून आलेल्या दुबईच्या दुसर्‍या विमानात बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि या विमानाने सकाळी अकरा वाजता दुबईच्या दिशेने उड्डाण केले.

दहा दिवसांपूर्वी नागपूर-पुणे इंडिगो विमानालाही पक्षाची धडक
नागपूर-पुणे इंडिगोचे विमान ६३१३५ हे टेक ऑफ करताना 10 दिवसांपूर्वी एका पक्ष्याची धडक बसल्याने उड्डाण रद्द करण्यात आले होते. हे विमान दुपारी 3.30 वाजता रिशेड्यूल करण्यात आले. तोपर्यंत प्रवाशांना पॅसेंजर लाऊंजमध्ये बसविण्यात आल्यामुळे त्यांची गैरसोय झाली आणि मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळाच्या आजूबाजूला कचऱ्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर याआधीही अनेकवेळा हरीण, रानडुक्कर आणि मोकाट जनावरे धावताना आढळून आली आहेत. कचऱ्यामुळे पक्ष्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

- Advertisement -

एप्रिलमध्येही विमानाला धडक
गेल्या महिन्यात इंडिगोचं विमान दिल्लीवरून मुंबईला येत असताना पक्ष्याची धडक बसली होती. त्यामुळे विमान कंप पावू लागल्याने हे पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आले होते. इंडिगो ए-३२० नियो या विमानाच्या इंजिनमध्ये या घटनेच्या आधाही इंजिनमध्ये कंपन होण्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याप्रकरणी तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. यापूर्वी 2 एप्रिल रोजीही इंडिगो ए-३२० नियो या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे या विमानाचे उड्डाण थांबण्यात आले होते. पुण्यावरून हे विमान नागपूरकडे रवाना झाले होते. त्यावेळी विमान कंप पावत होतं. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव विमान मागे घेण्यात आले होते.

- Advertisment -