Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE दुबईने भारतासह अन्य देशांतून येणाऱ्यांना प्रवास निर्बंधांतून दिली मुभा, पण 'या' आहेत...

दुबईने भारतासह अन्य देशांतून येणाऱ्यांना प्रवास निर्बंधांतून दिली मुभा, पण ‘या’ आहेत अटी

२३ जूनपासून लागू होणार 'हे' नियम

Related Story

- Advertisement -

दुबईने भारतसह इतर अनेक देशांमधून येणार्‍या आपल्या रहिवाशांसाठी विमान प्रवासावरील निर्बंध शिथील केले आहेत. परंतु या लोकांना युएईने मंजूर केलेल्या लसचे दोन्ही डोस घेणे बंधकारक आहे, गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, दुबईतील संकट आणि आपत्ती व्यवस्थापनविषयक सर्वोच्च समितीने दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि भारतातून दुबईत आलेल्या प्रवाशांसाठी ट्रॅव्हल प्रोटोकॉल़ अपडेट करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता भारतातून दुबईत जाणाऱ्या प्रवाश्यांना केवळ वैध व्हिसाची आवश्यकता भासणार आहे. एका अहवालानुसार, युएई सरकारने चार लसींना मान्यात दिली आहे. यात सिनोफर्मा, फायझर-बायोनटेक, स्पुतनिक-व्ही आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनका लसींचा समावेश आहे.

२३ जूनपासून लागू होणार ‘हे’ नियम

शेख मन्सूर बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या अध्यक्षतेखाली दुबईतील संकट आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वोच्च समितीने २३ जूनपासून दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि भारतातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी दुबईच्या ट्रॅव्हल प्रोटोकॉलच्या अपडेटची घोषणा केली. त्यामुळे भारतातून दुबईत जाणाऱ्या प्रवाशांना केवळ वैध व्हिसाची आवश्यकता असेल. तथापि, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियातील परप्रांतीय प्रवाशांना लसीकरण आणि पीसीआर चाचणी करण्याच्या अटींसह प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवासाच्या ४८ तास आधी आरटी-पीसीआर चाचणीतचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

तथापि, युएई (दुबई)च्या नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. केवळ क्यूआर कोडेड निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल त्यांच्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय दुबईला जाण्यापूर्वी ४ तास आधी भारतातून प्रवाशांना रॅपिड पीसीआर चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा दुबईला पोहोचल्यावर त्याची आणखी एक पीसीआर चाचणी घेतली जाईल. या व्यतिरिक्त दुबईला पोचल्यानंतर भारतातील प्रवाशांना त्यांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन केले जाईल. हा रिझल्ट जे 24 तासांच्या आत येणे अपेक्षित आहे.


 

- Advertisement -