घरताज्या घडामोडीराष्ट्रपतींच्या पाया पडणं महिला अभियंत्याच्या आलं अंगलट; तात्काळ निलंबन

राष्ट्रपतींच्या पाया पडणं महिला अभियंत्याच्या आलं अंगलट; तात्काळ निलंबन

Subscribe

राजस्थान सरकारमधील (Rajasthan Government) एका महिला अभियंत्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पाया पडणे अंगलट आले आहे. राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श केल्याने संबंधीत महिला अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.

राजस्थान सरकारमधील (Rajasthan Government) एका महिला अभियंत्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पाया पडणे अंगलट आले आहे. राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श केल्याने संबंधीत महिला अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. 4 जानेवारीला ही घटना घडली होती. (Due To Attempting To Touch President Droupadi Murmu Rajasthan Government Engineer Suspended For Security Breach)

मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने (Department of Health Engineering) या महिला अभियंत्याला (Women Engineer) निलंबित केले आहे. याप्रकरणी विभागाचे मुख्य अभियंता (प्रशासन) यांनी आदेश काढला आहे. त्याच्या आदेशानुसार, विभागाच्या कनिष्ठ अभियंता अंबा सियोल यांनी 4 जानेवारीला रोहेत इथे स्काऊट गाईड जांबोरीच्या (Scout Guide Jamboree) उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या (President Draupadi Murmu) पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करून प्रोटोकॉल मोडला. त्यांना राजस्थान लोकसेवा नियमांनुसार तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाने ही घटना राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत गंभीर चूक असल्याचे सांगत राजस्थान पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

नेमकी घटना काय?

- Advertisement -

राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू या रोहट जवळील निंबोली ब्राह्मण गावात उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. हेलिपॉडवर त्यांच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त करण्यात आला होता. राष्ट्रपती खाली उतरून कारच्या ताफ्याकडे जात असताना पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ विभागात तैनात असणारी महिला सुरक्षा कडे तोडून राष्ट्रपतींच्या जवळ आली आणि त्यांच्या पाया पडली. राष्ट्रपतींच्या विशेष सुरक्षा रक्षकांनी त्या महिलेला बाजूला सारले.

हा प्रकार निदर्शनास येताच पोलीस अधिक्षक गगनदीप सिंगला यांनी महिलेला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आणि रोहट पोलीस ठाण्यात नेऊन तिची चौकशी करण्यात आली. मात्र सुरक्षा कडे तोडून एक व्यक्ती थेट राष्ट्रपतींजवळ पोहोचल्याने गृहमंत्रालयाने राज्य पोलिसांकडे अहवाल मागवला आहे.


हेही वाचा – मी तुम्हाला तिळगूळ देते, गोड बोलायला सुरुवात करा; राणांचा ठाकरेंना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -