घरताज्या घडामोडीकरोनामुळे उद्योगपतींचे निघाले दिवाळे!

करोनामुळे उद्योगपतींचे निघाले दिवाळे!

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे डाऊ जोन्सचा औद्योगिक निर्देशांक लागोपाठ पाच दिवसांनी घसरून १२ टक्यांवर आला आहे. यामुळे 'जगातल्या ५०० अब्जाधीशांनी या वर्षाच्या सुरूवातीपासून कमवलेला ७८ अब्ज डॉलरचा नफा गमवला असल्याचे 'ब्लूमबर्ग' च्या निर्देशांकातून स्पष्ट झाले आहे'.

चीनमधील करोना व्हायरसचा परिणामामुळे आता अर्थव्यवस्था देखील ढासळत असल्याचे दिसत आहे. या करोना व्हायरसचा संसर्ग आतापर्यंत ५७ देशांत पसरला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेसमोर मोठा पेच निर्माण झाला असल्याने, २००८ पेक्षाही यावेळीचा आर्थिक मंदीचा फटका सगळ्यात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. अॅमेझॉनचे जॅफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेस्ट आणि फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग सारख्या अन्य ५०० उद्योगपतींचे तब्बल ४४४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

करोना व्हायरसमुळे डाऊ जोन्सचा औद्योगिक निर्देशांक लागोपाठ पाच दिवसांनी घसरून १२ टक्यांवर आला आहे. यामुळे ‘जगातल्या ५०० अब्जाधीशांनी या वर्षाच्या सुरूवातीपासून कमवलेला ७८ अब्ज डॉलरचा नफा गमवला असल्याचे ‘ब्लूमबर्ग’ च्या निर्देशांकातून स्पष्ट झाले आहे’. तसेच ‘येणाऱ्या काळात चीनमधील करोना व्हायरसचा प्रभाव रोखला नाही, तर अर्थव्यवस्थेवर आणखी मोठे संकट उभे राहू शकते’, असे ब्लूमबर्गच्या बिलोनिअर्स इंडेक्सने सांगितले आहे.

- Advertisement -

‘करोना’मुळे असा झाला परिणाम!

ब्लूमबर्गच्या अहवालानूसार संपत्ती निर्देशांक यादीत आता ८० टक्के अब्जाधीशांची क्रमवारी धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे. करोना हा व्हायरस दक्षिण कोरिया, इराण, अमेरिकायांसह ५७ देशांत पसरला आहे. अमेरिकेनंतर महासत्ता असलेले चीन अनेक मोठ-मोठ्या व्यापाऱ्यांसोबत चीनचे संबंध आहेत. मात्र, करोनामुळे आता आयात-निर्यातीत अनेक अडचणी येत आहेत. तर जगात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, एसव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना सर्वाधिक तोटा झाला असून, त्यांची संपत्ती एकूण ३० अब्ज डॉलर्सने घसरली आहे.

हिंदूस्थानात शेअर बाजारला १० लाख कोटींचा फटका बसला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिचे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ५ अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. तसेच भारतातील विप्रो कंपनीचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणावर घसरलेले दिसत आहेत. विप्रोचे कंपनीचे प्रमुख अझीम प्रमोजी यांच्या संपत्ती ८६९ दशलक्ष डॉलर्सने घसरण झाली आहे. डाऊ जोन्सचा औद्योगिक सरासरी निर्देशांक १२ टक्क्यांनी घसरला असून २००८च्या आर्थिक पेचप्रसंगानंतर हा सगळ्यात जास्त मोठा आर्थिकपेच समोर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा- असंतुलित मांसाहारामुळे चीनमध्ये कोरोनाचे संकट – भाजप नगरसेवक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -