घरCORONA UPDATEVideo: रुग्णवाहिका मिळाली नाही, आईच्या कडेवरच ३ वर्षांच्या मुलाचा करुण अंत

Video: रुग्णवाहिका मिळाली नाही, आईच्या कडेवरच ३ वर्षांच्या मुलाचा करुण अंत

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे देशभरातील सर्वच राज्य लॉकडाऊन झालेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना आरोग्य सेवा द्यावी, असे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेले आहेत. मात्र तरिही बिहारमध्ये एक दुःखद घटना घडली. बिहारच्या जहानाबाद येथे एक आई आपल्या तीन वर्षांच्या आजारी मुलावर उपचार व्हावेत, यासाठी धावपळ करत होती. मात्र तिच्या मुलाला उपचार मिळाले नाही. तर दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी साधी रुग्णवाहिका देखील मिळाली नाही. यातच त्या इवल्याश्या मुलाने आपल्या आईच्या कडेवरच प्राण सोडले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

अरवल जिल्ह्यातील एका ३ वर्षांच्या मुलाला ताप आला होता. त्यानंतर पालकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तिथे मुलावर उपचार करण्यासाठी नकार देण्यात आला. अरवल येथून त्यांना जहानाबाद आणि तिथून पटनाला त्यांना पिटाळण्या आले. जहानाबाद येथून जाताना त्यांना साधी रुग्णवाहिका देखील मिळाली नाही. त्यामुळे या तीन वर्षाच्या मुलाचा आईच्या कडेवरच मृत्यू झाला. मृत्यूच्या नंतरही या पालकांना मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

- Advertisement -

मुलाच्या वडिलांनी आरोप केला की, जहानाबादच्या डॉक्टरांनी मुलावर उपचार करण्यास नकार दिला. तसेच पटनाला जाण्यासाठी आम्हाला रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन दिली नाही. यामुळे आम्ही पायीच मुलाला घेऊ निघालो. यानंतर जहानाबादचे जिल्हाधिकारी नवीन कुमार यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा देण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितावर कारवाई करु, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या घटनेनंतर बिहारमधील आरोग्य विभागाची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार हे आरोग्य व्यवस्था सुधारू शकलेले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -