अचानक विमान रद्द केल्यानं लंडन विमानतळावर अडकले ३०० भारतीय प्रवासी

भारतात येणारे इंडियन एअरलाईनचे विमान लंडन सरकारने अचानक कोणत्याही सूचना न देताच रद्द केल्याची माहिती समोर येत. विमान रद्द केल्याने ३०० भारतीय प्रवासी लंडन विमानतळावर अडकल्याचे समजते.

International Flights Will Resume From march After 23-Months Ban

भारतात येणारे इंडियन एअरलाईनचे विमान (Flight) लंडन सरकारने (London Government) अचानक कोणत्याही सूचना न देताच रद्द केल्याची माहिती समोर येत. विमान रद्द केल्याने ३०० भारतीय प्रवासी (Indian Passengers) लंडन विमानतळावर अडकल्याचे समजते. कोणतीही सूचना न दिल्याने भारतीय प्रवाशांची लंडन विमानतळावर (London airport) मोठी गैरसोय होत आहे. (due to flight canceled by Indian Airlines without notice 300 Indian passengers stranded at London airport)

लंडन विमानतळावर अडकलेल्या भारतीय प्रवाशांपैकी काही प्रवाशांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. काही प्रवाशांनी तर हॉटेममधून आपले चेकआऊटही केले आहे. शिवाय विमानतळ संचालक या संदर्भात बोलण्यास तयार नाही आहे. दरम्यान, या प्रवाशांना विमान रद्द करण्याबाबतची कोणतीही माहिती मोबाईल मेसेज अथवा मेलद्वारे न देताच विमान रद्द केले. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडन विमान तळावर अडकलेले सगळे भारतीय प्रवासी हे भारताकडे निघण्यासाठी विमानतळावर आले होते. त्यावेळी अचानक विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी याबाबत जाब विचारण्यासाठी घेरावसुद्धा घातला.

विमान रद्द झाल्याने “उद्या हे विमान कधी जाईल तेही सांगण्यात आलेले नाही. प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. शेकडो प्रवासी रस्त्यावर आहेत. राहण्याची व्यवस्था करून द्यावी. ३०० लोकं अडकले आहेत. भारताच्या नागरी उड्डायण विभागने मदत करावी”, अशी विनंतीही प्रवासी करत आहेत.

भारतीय प्रवासी या घटनेमुळं चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी विमानतळ प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही. लंडन विमानतळावरून मुंबईला येणारे विमान वातावरणातील बदलामुळे इंडियन एअरलाईन्सने रद्द केले. दोन तास प्रवास करून लंडन येथील विमानतळावर पोहचले. पण, याठिकाणी राहण्याची कुठलीही व्यवस्था नाही. तसेच वाहतूक व्यवस्थासुद्धा नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

“लहान मुलं रडत आहेत. इथून परत जाऊन दुसरीकंड राहण्याचा लंडनमध्ये मोठा खर्च आहे. काहींकडं असा खर्च करण्यासाठी बजेट नाही. अशावेळी त्यांनी काय करायचं, असा सवाल प्रवासी करताहेत. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांच्या समस्येवर उपाय शोधावा. राहण्याची व्यवस्था करून द्यावी. किंवा वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी”, अशी मागणी करण्यात आली.


हेही वाचा – तेलंगणामध्ये शालेय बस पुराच्या पाण्यात बुडाली; ३० विद्यार्थ्यांना स्थानिकांनी सुखरूप बचावले