घरताज्या घडामोडीटोळधाड : हवेचा प्रवाह बदलल्यामुळे टोळांचे संकट टळू लागले!

टोळधाड : हवेचा प्रवाह बदलल्यामुळे टोळांचे संकट टळू लागले!

Subscribe

जोरदार वाऱ्यामुळे टोळांच्या टोळीची दिशा बदलली आहे. आता हे टोळ राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे थेट पाकिस्तानकडे जाईल, असे सांगण्यात येत आहे.

टोळधाडीने त्रस्त असलेल्या राज्यांना एक चांगली बातमी आहे. आता हवेचा प्रवाह बदलत आहे. त्यामुळे टोळ आता जास्त काळ थांबणार नाही. जोरदार वाऱ्यामुळे टोळांच्या टोळीची दिशा बदलली आहे. आता हे टोळ राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे थेट पाकिस्तानकडे जाईल, असे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील झाशी येथे थांबला होता, शुक्रवारी मध्य प्रदेशातील दतिया, निवारी आणि टीकमगडमध्ये दाखल झाले. त्यामुळे पन्ना आणि कटनी यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, पंजाबमध्ये जोरदार वाऱ्यामुळे टोळ्यांचा मार्ग थांबला आहे, त्यामुळे दिल्लीवर त्यांचे आक्रमण होण्याची शक्यता संपली आहे. तरीही प्रशासन अजूनही सतर्क आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी वाऱ्याची दिशा उत्तर-पश्चिम होती, जी आता पूर्वेकडे वळली आहे. म्हणूनच टोळ टीम आता राजस्थान व मध्य प्रदेशच्या काही भागातून पाकिस्तानच्या दिशेने जाईल.

राजस्थानातील २१ जिल्ह्यांवर टोळ्यांचे सावट

राजस्थानमध्ये टोळांची दहशत कायम आहे. टोळ्यांमुळे शेतकरी व सरकार दोघेही त्रस्त आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यांमधील सुमारे ९५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये टोळांनी आपला प्रभाव दाखवला आहे.

- Advertisement -

४० टक्के टोळ नष्ट

मध्य प्रदेशातील कृषी संचालक संजीव सिंह म्हणाले की, टोळांच्या नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारची टीम सातत्याने कार्यरत आहेत. बैतुल, प्रभातपट्टनम येथे टोळांवर कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली आणि त्यातील ४० टक्के टोळ नष्ट करण्यात आले. गुरुवारी बालाघाटात टोळांची टोळी सक्रिय होती. रीवामध्ये पाच-सहा किलोमीटर लांबीपर्यंत टोळ पसरले होते आणि त्रास देत होते. हरदा आणि पांडोखर गावात अग्निशमन दलाच्या माध्यमातून शंभर लिटर कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. मग टोळांची टोळी सतनाकडे गेली. पाच ट्रॅक्टर चालित स्प्रे पंप आणि दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी किटकनाशकाची फवारणी केली.

पंजाबमध्ये धोका टळला

गुरुवारी संध्याकाळी पंजाबमध्ये जोरदार वाऱ्यामुळे राजस्थानातील संगरियाजवळील टोळ्यांची टोळीची दिशा बदलली. यामुळे येथे टोळाच्या धोका टळला आहे. परंतु पंजाब-हरियाणा सीमेवर डूमवाली गावच्या बॅरियरवर कृषी विभागाचे पथक जागरुक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -