Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मोदी सरकारच्या मनात आले म्हणून..., संजय राऊत यांची भाजपावर घणाघाती टीका

मोदी सरकारच्या मनात आले म्हणून…, संजय राऊत यांची भाजपावर घणाघाती टीका

Subscribe

मुंबई : मोदी यांच्या सरकारने अचानक संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, पण त्या अधिवेशनाची नक्की योजना काय? ते कुणालाच माहीत नाही. निमंत्रण आले आहे, पण हे निमंत्रण लग्नाचे, मुंजीचे, कुणाच्या जयंती-पुण्यतिथीचे की आणखी कशाचे? मोदी सरकारच्या मनात आले म्हणून त्यांनी अधिवेशनाचा एक सोहळा आयोजित केला व निमंत्रणे धाडली. यावर जाब विचारणारी टोलेजंग माणसे आज दिल्लीत दिसत नाहीत, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी लोकांची चांगली करमणूक करीत आहेत…, संजय राऊत यांची टीका

- Advertisement -

या देशातील असे एक क्षेत्र दाखवा की, जेथे अवमूल्यन झाले नाही. राष्ट्रपती पदापासून सर्व तऱ्हेच्या राजकीय घटनात्मक पदांचे जाणीवपूर्वक व सोयीचे म्हणून अवमूल्यन करण्यात आले आहे. भुसा भरलेली माणसे एकेका खुर्चीवर बसवली आहेत व दोन-चार माणसेच सत्ता चालवीत आहेत. राष्ट्र बेरोजगार, भुकेलेले आहे त्याची चिंता कोणी करायची? देशात फक्त कसरती व करमणुकीचे कार्यक्रम चालले आहेत, असे भाजपच्याच एका वयोवृद्ध नेत्याने सांगितले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी दैनिका सामनातील रोखठोक सदरात म्हटले आहे.

भाजपाने विचारले, विरोधकांना ‘भारत’ शब्दांशी वैर का? भाजपावाले सडक्या मेंदूचे राजकारण करतात. आजचा इंडिया किंवा भारत घडविण्यात त्यांचे कोणतेच योगदान नाही. सर्व घटनात्मक संस्था, संघटनांचा ताबा घेऊन आपली माणसे तेथे बसवणे म्हणजे ‘भारत’ घडवणे, असे होत नाही. भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले. ते संविधान मोडणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाकारणे असे आहे, असे त्यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – G20 Delhi: भारतातील G-20 शिखर परिषदेत काय झालं? देश, विदेशी मीडियाने काय म्हटलंय; वाचा सविस्तर

प्रकाश आंबेडकर सनातन धर्मावर त्वेषाने बोलतात, पण भाजपा सध्या करीत असलेल्या संविधानाच्या मोडतोडीवर त्यांनी हल्ला करायला हवा. देशाची लोकशाही, संविधान आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य धोक्यात आहे व विदेशी पाहुण्यांना ‘मदर आाफ डेमॉक्रसी’ अशा पुस्तिका वाटून स्वत:चा उदो उदो केला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -