उत्तरप्रदेशात धावत्या गाडीवर ओव्हरटेक करतना पलटला डंपर; २ मुलांसह ५ जणांचा मृत्यू

एका चालत्या गाडीवर डंपरने पलटी मारल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक कुटुंब जेवणासाठी धाब्यावर गेले होते.

UP Accident

एका चालत्या गाडीवर डंपरने पलटी मारल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक कुटुंब जेवणासाठी धाब्यावर गेले होते. त्यावेळी जेवण करून घरी जात असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात २ मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. (dumber overturned on moving car in up 5 dies including two children)

मिळालेल्या माहितीनुसार, रायबरेली-प्रयागराज NH 30 च्या भदोखर पोलीस स्टेशन हद्दीतील मुन्शीगंजमध्ये धावत्या गाडीवर राखेने भरलेला डंपर उलटला. या अपघातात २ मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. हा डंपर राखेने भरला होता. हा डंपर ओव्हरटेक करत असताना ताबा सुटल्याने इको स्पोर्ट कारवर डंपरने पलटी मारली.

सुदैवाने या अपघातात ३ मुले बचावली आहेत. यामधील एका बालकाला उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी पाच जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच एसपी आलोक प्रियदर्शी, सीएमओ वीरेंद्र सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसह अनेक पोलिस ठाण्यांचा ताफा जिल्हा रुग्णालयात पोहोचला. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.


हेही वाचा – शिंदे गटातील अपात्र आमदारांवर तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी