घरदेश-विदेशLockdown Effect: कोरोनादरम्यान दिल्लीत ५१ टक्के मुलांच्या BMI मध्ये झाला बिघाड!

Lockdown Effect: कोरोनादरम्यान दिल्लीत ५१ टक्के मुलांच्या BMI मध्ये झाला बिघाड!

Subscribe

देशभरात गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने कहर केले आहे. या काळात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला होता. यादरम्यान, विविध क्षेत्रांना लॉकडाऊनचा फटका बसला. कोरोना साथीच्या काळात जवळपास एक वर्षापासून शाळा बंद आहेत त्यामुळे ही मुले त्यांच्या घरात कैद केल्यासारखे अडकून आहेत. मात्र याचा मुलांच्या शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. एका सर्वेक्षणात असे समोरआले की, दिल्लीतील ५१ टक्के मुलांमध्ये बॉडी मास इंडेक्समध्ये (BMI) बिघाड झाला आहे. अशी मुले बहुतेक बंगळूर आणि चेन्नईमध्ये देखील असल्याचे सांगितले जात आहे.

स्पोर्ट्स व्हिलेज स्कूलने दिल्लीतील १८ हजार ५४९ मुलांवर एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वार्षिक आरोग्य सर्वेक्षण (AHS) सर्वेक्षणात २५० शहरे व शहरांमधील ३६४ शाळांमधून ७ ते १७ वर्षे वयोगटातील २ लाख ५४ हजार ६८१ मुलांचा सहभाद करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान देशभरातील मुलं तंदुरुस्त नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. दिल्लीत मुलांसाठी अनहेल्दी बीएमआयच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील ५० टक्के मुलांमधील BMI मध्ये बिघाड झाला होता.

- Advertisement -

राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणातून असे समोर आले की, प्रत्येक २ पैकी एका मुलामध्ये चुकीचा बीएमआय निर्देशांक आहे. अपर बॉडी स्ट्रेंथसाठी, ५ पैकी ३ मुले अस्वस्थ आहेत. लोअर बॉडी स्ट्रेंथच्या बाबतीत, ३ पैकी २ मुले अस्वस्थ आहेत. एब्डॉमिनल स्ट्रेंथच्या बाबतीत, ६ पैकी १ मुल अस्वस्थ आहे. दिल्लीमध्ये, एरोबिक क्षमतेच्या बाबतीत १० पैकी ९ मुले अस्वस्थ असल्याचे आढळले, तर ५ पैकी २ मुले कोर स्ट्रेंथच्या बाबतीत अस्वस्थ असल्याचे आढळले. एरोबिक क्षमता आणि कोर स्ट्रेंथच्या निरोगी असलेल्या मुलांच्या टक्केवारीत ३३ टक्के आणि १० टक्क्यांनी घट झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुलांपेक्षा निरोगी बीएमआय निर्देशांकाची पातळी मुलींमध्ये जास्त असल्याचे दिसून आले आहे. मुलींमध्ये बीएमआय पातळी ४८ टक्के आणि मुले ४४ टक्के असल्याचे सांगितले जात आहे.


Green Fungus: काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या बुरशीनंतर आढळला हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण; जाणून घ्या

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -