घरट्रेंडिंगLockDown: रस्त्यावर सांडलेल्या दुधासाठी कुत्र्यांसह माणूस एकत्र; व्हायरल व्हिडिओ

LockDown: रस्त्यावर सांडलेल्या दुधासाठी कुत्र्यांसह माणूस एकत्र; व्हायरल व्हिडिओ

Subscribe

उत्तर प्रदेशमधील आग्रातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशभरात कोरोना व्हायरस कहर वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे ३०० हून अधिक जणांच्या देशात मृत्यू झाला आहे. तसंच ९ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आग्रामधील एक अस्वस्थ करणार व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आग्रामधील रामबाग चौकात दूध रस्त्यावर सांडलेल आहे. या दुधासाठी माणूस आणि कुत्रे एकत्र आलेले दिसत आहे. व्हिडिओतला माणूस एका मडक्यात ओंजळीतून दूध भरताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला कुत्रे ते दूध पिताना दिसत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र हाच लॉकडाऊन पुढे वाढवणार असल्याचं अंदाज वर्तवले जात आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे उद्या मोदी लॉकडाऊन वाढवण्याविषयी बोलू शकतील अशी शक्यता आहे.

- Advertisement -

देशातील काही राज्याने अगोदर लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसासह अनेक राज्याने लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४८३ कोरोनाचे रुग्णांची संख्या असून त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ४६ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: तबलीगीच्या कार्यक्रमात उपस्थितीत राहिलेल्या कोरोना रुग्णामुळे १४ गावं सील!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -