सिकंदराबाद : तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका मुलीने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. आपल्या समस्यांबाबत बोलण्याच्या अट्टाहासाने रॅलीत पोहोचलेली ही तरुणी रॅलीच्या आवारात उभारलेल्या लाईट लावलेल्या टॉवरवर चढली. तरुणीला पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला तातडीने खाली उतरण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवून तरुणीला खांबावरून खाली उतरण्याचे आवाहन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (During Prime Minister Narendra Modis speech She climbed the pillar Type in assembly in Telangana)
एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसारीत केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक तरुणी लाइट लावण्यासाठी तयार केलेल्या टॉवरच्या संरचनेवर चढली. भाषण करताना पंतप्रधान मोदींची नजर त्या मुलीवर पडताच त्यांनी आपले भाषण थांबवले आणि मुलीला तातडीने खाली उतरण्याचे आवाहन केले. 3 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सलग दुसऱ्या रॅलीसाठी तेलंगणाच्या दौऱ्यावर आले होते.
#WATCH | Secunderabad, Telangana: During PM Modi’s speech at public rally, a woman climbs a light tower to speak to him, and he requests her to come down. pic.twitter.com/IlsTOBvSqA
— ANI (@ANI) November 11, 2023
पंतप्रधानांनी विनंती केल्यानंतर ती खाली उतरली
आपले म्हणणे ऐकून घ्यावे या भूमिकेवर ठाम असलेली तरुणी लाइट लावण्याच्या टॉवरवर चढली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या तरुणीला उद्देशून म्हटले की, त्या तिथे विद्यूत तारांमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट मोठा अपघात होऊ शकतो. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या तरुणीला ‘बेटा, खाली ये’ असे म्हणताना ऐकू येत आहेत. आम्ही तुझ्या सोबत आहोत. या वायरची स्थिती चांगली नाही. शॉर्ट सर्किट होऊ शकते. यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही. मी तुमच्यासाठी आलो आहे. मी तुझे ऐकेन. पंतप्रधानांच्या व्हीव्हीआयपी कार्यक्रमात झालेला व्यत्यय आणि बराच वेळ आपल्या आग्रहावर ठाम असलेली ही तरुणी पाहून तेथे उपस्थित इतर लोकही हैराण झाले.
हेही वाचा : पोलिसांना बाजुला ठेवा आणि या; उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान
तेलंगणात राजकीय रणधुमाळी
तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. पक्षाचे दिग्गज नेते उमेदवारांचा प्रचार करत असून जाहीर सभांना संबोधित करत आहेत. त्याच क्रमाने पंतप्रधान मोदींनीही तेलंगणा गाठले आणि एका जाहीर सभेला संबोधित करताना राज्यातील जनतेकडून भाजपला पाठिंबा मागितला. येथे त्यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार निशाणा साधला.