घरदेश-विदेशबेरोजगारी हटवू म्हणणाऱ्या भाजपाच्या काळात नोकरीचा टक्का घसरला

बेरोजगारी हटवू म्हणणाऱ्या भाजपाच्या काळात नोकरीचा टक्का घसरला

Subscribe

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा भाजपाने केली होती

बेरोजगारीवर मात फिरसे मोदी सरकार…सध्या अशा पोस्ट सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच भाजपाकडूनही बेरोजगारी दूर करण्याचे लक्ष असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा भाजपाने केली होती. मात्र, गेल्या चार वर्षांत नोकरीचा टक्का घसरल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. तब्बल ३३ लाख ४ हजार ३०५ अधिसूचित झालेल्या रिक्तपदाएवजी फक्त ८ लाख २३ हजार १०७ उमेदवारांना नोकरी मिळाली आहे.

अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक्ता संचालनालय विभागाकडून मिळाली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महाराष्ट्र सरकारकडे २०१३ पासून राज्यात किती रोजगार कोणत्या विभागात निर्माण केले आहे. तसेच, राज्यात किती बेरोजगारी वाढली आहे आणि राज्यात रोजगार वाढविण्यासाठी सरकारने काय उपाय योजना केलेल्या आहेत, या संदर्भातील माहितीचा आढावा घेतल्यास सदर माहिती समोर आली.

- Advertisement -

३५ लाखांहून जास्त नोंदणी

जानेवारी २०१३ ते मार्च २०१९ मार्च पर्यंत एकूण ३४ लाख २३ हजार २४३ अधिसूचित झालेल्या रिक्तपदाएवजी फक्त ९ लाख ३७ हजार ७६५ उमेदवारांना नोकरी लागली असून ३५ लाख २३ हजार २७२ बेरोजगार उमेदवारांनी यामध्ये नोंदणी केली होती. तसेच राज्यात्त रोजगार वाढविण्यासाठी सरकारमार्फत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना विविध सवलती देवून आर्थिकदृष्ट्या बळकट करणे, आदिवासी उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सारखे उपाययोजना राबविण्यात येत आहे.

वर्ष           अधिसूचित रिक्तपदे          नोकरी लागलेले उमेदवार

- Advertisement -

२०१३        १,१८,९३८                             १,१४,६५८
२०१४        ८,४१,१६४                               ८४,७०७
२०१५        ५, ७१,४१८                          १, २५, ४५७
२०१६        ५,७६,८५७                             १,४४,०३४
२०१७         ४,१३,१९५                             २, २२, ६३९
२०१८         ७, ८५,३९०                           १, ९७, ९७८
२०१९           १,१६,२८१                               ४८,२९२ (मार्च अखेरपर्यंत)

अधिसूचित बेरोजगारांची आकडेवारी

वर्ष २०१३ – ६,३०, ३६४
वर्ष २०१४ – ५,३६, ४९८
वर्ष २०१५ – ४, ६१, ९१०
वर्ष २०१६ – ४,६०,०६१
वर्ष २०१७ – ५,३९, ३००
वर्ष २०१८ – ७,२६,९८२
वर्ष २०१९ – १,६८,१५७ (मार्च अखेरपर्यंत)

ही आकडेवारी पाहता २०१३ ते २०१९ मार्च अखेरपर्यंत तब्बल ३५ लाख २३ हजार २७२ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली असून, २०१३ मध्ये आघाडी सरकारने एकूण १,१८,९३८ अधिसूचित झालेल्या रिक्तपदा एवजी एकूण १,१४,६५८ उमेदावारांना नोकरी दिलेली आहे.

ही आकडेवारी धक्कादायक असून, देशाचे सुशिक्षित तरुण आजही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे भाजपाची आश्वासने म्हणजे फुसका बार आहे.

– शकील अहमद, आरटीआय कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -