घरदेश-विदेशDussehra : समाजाला तोडणारी नको जोडणारी भाषा हवी - मोहन भागवत

Dussehra : समाजाला तोडणारी नको जोडणारी भाषा हवी – मोहन भागवत

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी दसऱ्यानिमित्त नागपूरमध्ये बोलताना देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी, असं म्हणाले. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात जर भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो, असं देखील भागवत म्हणाले. तसंच, लोकांमधील संवाद सकारात्मक असायला हवा. स्वकियांचा विसर पडल्याने भेदभाव वाढला असल्याचं मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले त्याग आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यतासाठी अनेकांनी परिश्रम केले. स्वतंत्रता का हवी यावरही देशात संघर्ष झाला. स्वातंत्र्यासाठी फाळणीचं दु:खही अनुभवलं. हरवलेली अखंडता परत मिळवायची असेल तर सध्याच्या पिढीने इतिहास जाणून घ्यायला हवा. शत्रूता, भेद याची पुनरावृत्ती नको, असं मोहन भागवत म्हणाले.

- Advertisement -

पुढे बोलताना त्यांनी मनातील भेदभावाची भावना बदलायला हवी. समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी. लोकांमधील संवाद सकारात्मक असायला हवा. स्वकियांचा विसर पडल्याने भेदभाव वाढला आहे. देशातील दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जात आहे. त्यामुळे कुठेतरी हरवत चाललेली अखंडता परत मिळवण्यासाठी आणि रत त्या दुश्मनीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांनी इतिहास वाचला पाहिजे, असं मोहन भागवत म्हणाले.

देशात अंमली पदार्थांचा वापर वाढतोय

मोहन भागवत यांनी देशात वाढत असलेल्या अंमली पदार्थांवर देखील भाष्य केलं. देशात अंमली पदार्थांचा वापर वाढत आहे. ते कसं थांबवावं माहित नाही. उच्च वर्गापासून ते खालच्या वर्गापर्यंत समाजातील सर्व स्तरात व्यसन आहे. या व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो हे आपल्याला माहित आहे. सिमेपलीकडील देश त्याला प्रोत्साहन देतात. अनियंत्रित गोष्टी वाढत आहेत. बिटकॉईन सारखी करन्सी आहे, त्यावर कोणाचं नियंत्रण आहे माहित नाही. या सर्वांवर नियंत्रण ठेवणे, ड्रग्जसारख्या व्यसनांचा पूर्ण विनाश व्हावा, हे सरकारने करावे, असं मोहन भागवत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -