घरदेश-विदेशLOC वर घुसखोरीचा प्रयत्न करणारा आत्मघातकी हल्लेखोर हुसेनचा मृतदेह पाकिस्तानच्या ताब्यात

LOC वर घुसखोरीचा प्रयत्न करणारा आत्मघातकी हल्लेखोर हुसेनचा मृतदेह पाकिस्तानच्या ताब्यात

Subscribe

नवी दिल्ली – आत्मघातकी हल्लेखोर तबारक हुसैनचा मृतदेह पाकिस्तानकडे सोपवण्यात आला. शनिवारी राजौरी येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तबराक हुसैनला जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील नौशेरा सेक्टरमधून घुसखोरीचा प्रयत्न करताना लष्कराने पकडले होते.

डॉ. मनमीत कौर यांनी सांगितले की, तबरक हुसैन यांचा मृतदेह आज सकाळी 11.6 वाजता पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. तबराक हुसैन 21 ऑगस्ट रोजी एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न करताना पकडला गेला होता. यादरम्यान त्यांच्या पायाला आणि खांद्यावर गोळी लागली होती. यानंतर त्याला उपचारासाठी राजौरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

आत्मघातकी हल्ल्याची केली होती तयारी  –

त्याला पकडल्यानंतर चौकशीत तबरक हुसेनने सांगितले होते की, त्याला भारतात आत्मघातकी हल्ल्यासाठी पाठवण्यात आले होते. लष्कराच्या चौकीवर आत्मघातकी हल्ल्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती. घुसखोरीचा प्रयत्न करत असतानाच भारतीय जवानांनी त्याला पकडले. या गोळीबारात त्यालाही गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

पाकिस्तान गुप्तचर संस्थेच्या (ISI) कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याने भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यासाठी 30,000 रुपये दिले होते, असा खुलासाही तबरकने चौकशीदरम्यान केला होता. 32 वर्षीय तबराक हा पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली येथील सबजाकोट गावचा रहिवासी होता. प्रत्यक्षात घुसखोरी दरम्यान, जेव्हा त्याचे साथीदार सीमेवरील कुंपण कापत होते, तेव्हा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि यावेळी तबरकला गोळी लागली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -